येचुरी माकपचे सरचिटणीस!
By Admin | Updated: April 20, 2015 03:11 IST2015-04-20T03:11:01+5:302015-04-20T03:11:01+5:30
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य सीताराम येचुरी यांची रविवारी पक्ष सरचिटणीसपदी एकमताने निवड करण्यात आली. माकपने २१ व्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये ९१

येचुरी माकपचे सरचिटणीस!
विशाखापट्टणम : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य सीताराम येचुरी यांची रविवारी पक्ष सरचिटणीसपदी एकमताने निवड करण्यात आली.
माकपने २१ व्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये ९१ सदस्यांची केंद्रीय समिती व १६ सदस्यांच्या पॉलिट ब्युरोचीही निवड केली आहे. मावळते सरचिटणीस प्रकाश करात यांनी सरचिटणीसपदासाठी येचुरी यांचा प्रस्ताव दिला आणि एस. रामचंद्रन पिल्लई यांनी त्याचे अनुमोदन केले. हे भविष्यातील अधिवेशन असून पक्षाच्या भविष्याचे आणि देशाच्या भविष्याचे आहे. डावी व लोकशाही शक्ती बळकट करणे हे आमचे काम आहे, असे येचुरी म्हणाले.