शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

2017 मध्ये भारतीय लष्कराने घातले तब्बल 138 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 16:56 IST

सख्खे शेजारी आणि पक्के वैरी असलेल्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सरलेल्या 2017 या वर्षातही कायम राहिला. दरम्यान, पाकिस्तानकडून सीमेवर सुरू असलेल्या कारवायांना प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने  2017 मध्ये तब्बल...

नवी दिल्ली/जम्मू - सख्खे शेजारी आणि पक्के वैरी असलेल्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सरलेल्या 2017 या वर्षातही कायम राहिला. नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये गोळीबाराच्या घटना सातत्याने घडल्या. त्यात दोन्हीकडच्या सैन्याची जीवितहानी झाली. दरम्यान, पाकिस्तानकडून सीमेवर सुरू असलेल्या कारवायांना प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने  2017 मध्ये तब्बल 138 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याची माहिती समोर आली आहे. सरकारशी संबंधित असलेल्या गुप्तहेर खात्यामधील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. नियंत्रण रेषेवर सातत्याने कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानविरोधात भारतीय लष्कराला मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.2017 मध्ये पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू होते. त्याला भारतीय लष्कराकडूनही वेळोवेळी चोख प्रत्युत्तर दिले गेले. या कारवाईमध्ये अनेक पाकिस्तानी सैनिक ठार झाले. तसेच पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या. काही वेळा भारतीय लष्कराने केलेली कारवाई एवढी तीव्र होती की, पाकिस्तानला पांढरे निषाण फडकवून सीजफायरसाठी विनवणी करावी लागली. सीमारेषेजवळून पाकिस्तानकडून होणाऱ्या कारवायांना आळा घालण्यासाठी भारतीय लष्कराकडून सप्टेंबर 2017 मध्ये ऑपरेशन अर्जुन चालवण्यात आले होते. त्यावेळी भारतविरोधी कारवायांना मदत करणारे पाकिस्तानचे माजी सैनिक, आयएसआय आणि रेंजर्समधील अधिकाऱ्यांची घरे आणि निवासस्थानांना लक्ष्य करण्यात आले होते. या कारवाईनंतर भारताकडे गोळीबार थांबवण्याची विनंती करणे पाकिस्तानला भाग पडले होते.   त्यानंतर डिसेंबर महिन्यात भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानच्या ताब्यातील भागात 250 ते 300 मीटर आत प्रवेश करून आपल्या चार सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेतला होता. मात्र ही सर्जिकल स्ट्राइकसारखी मोठी कारवाई नव्हती. पण लष्करी विभागात सिलेक्टिव्ह टार्गेटिंग असे नाव दिलेल्या या कारवाईत पाकिस्तानच्या तीन सैनिकांना ठार करण्यात आले होते. त्यानंतर हल्लीच बीएसएफने आपल्या एका सैनिकाच्या मृत्यूचा बदला 10 ते 12 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घालून केला होता.  याशिवाय गेल्या वर्षभरात लष्कराने काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या नायनाटासाठी ऑपरेशन ऑलआऊट सुरू केले आहे, या अभियानांतर्गत लष्कराने दोनशेहून अधिक दहशतवाद्यांना ठार मारले होते. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर