शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 10:10 IST

अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात वडोदरा येथील यास्मिन व्होरा यांचाही मृत्यू झाला.

Ahmedabad Plane Crash:अहमदाबादमध्ये गुरुवारी झालेल्या भीषण विमान अपघातात २४१ प्रवाशांसह २७० जणांचा भीषण मृत्यू झाला. अहमदाबादहून लंडनला जाणारे हे विमान उड्डाण केल्यानंतर काही क्षणात कोसळलं आणि मोठा स्फोटा झाला. या विमान अपघातात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. यामध्ये वडोदरा येथील ५१ वर्षीय यास्मिन व्होरा यांचेही कुटुंब आहे. यास्मिन व्होरा यांनी ९ जून ऐवजी १२ जून रोजी लंडनला जाणाऱ्या फ्लाईटने जाण्याचा निर्णय घेतला होता. यास्मिन त्यांच्या गर्भवती सुनेला मदत करण्यासाठी निघाल्या होत्या. हे कुटुंब आपला आनंद द्विगुणीत करण्यासाठी निघालं होतं. मात्र यास्मिन यांनी आखलेली योजना पूर्ण झाली नाही आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

गुरुवारी दुपारी यास्मिन या एअर इंडियाच्या फ्लाईट AI१७१ मधून लंडन गॅटविकला जात होत्या. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच, बोईंग ८७८ ड्रीमलायनर विमानतळाच्या बाहेर असलेल्या दाट लोकवस्ती असलेल्या मेघानी नगरमधील एका  वसतिगृहात कोसळले. या अपघातात विमानातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला तर केवळ एकच प्रवासी बचावला. यास्मिन यांच्यासोबत प्रवास करणारा त्यांचा पुतण्या परवेझ याचाही मृत्यू झाला. 

यास्मिन यांचे पती यासिन व्होरा आता अहमदाबादमधील सिव्हिल हॉस्पिटलमधील पोस्टमार्टेम सेंटरच्या बाहेर कडक उन्हात वाट पाहत आहेत. पीडितांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी सुरू आहे. आम्ही तिला विमानतळावर सोडल्यानंतर, अपघाताची माहिती मिळाली असं यासिन सांगतात. जेव्हा मला कळले की विमानात १.२५ लाख लिटर इंधन आहे, तेव्हा मला आतून खात्री पटली की मी तिला पुन्हा कधीही भेटणार नाही. तरीही मी तिला शोधत रुग्णालयात गेलो, पण मृतदेह आणि जखमींना घाईघाईने आत आणताना पाहिल्याचे यासिन म्हणाले.

"माझी दोन्ही मुले युकेमध्ये आहेत. लहान मुलाची पत्नी गर्भवती आहे. त्यासाठी यास्मिन तिची काळजी घेण्यासाठी जात होती. तिथे पाच ते सहा महिने थांबणार होती. शेवटी सगळ्यांची माफी मागून ती निघाली होती. मी माझ्या भाच्याचा तिला सोडायला एअरपोर्टवर गेलो होतो. ती खूप खुश होती. माझ्या सुनेला जे काही हवं होतं ते सर्व ती घेऊन जात होती. विमानातून तिने मला व्हिडिओ कॉल केला आणि मी जात आहे असं सांगितलं आणि तुमची काळजी घ्या असं म्हटलं," असं यासिन व्होरा म्हणाले.

"मुलांना या घटनेविषयी कळलं होतं मी मोठ्या हिमतीने त्यांना सांगितले की आता तुमची आई राहिलेली नाही ते काही बोलू शकले नाहीत त्यांनी रडायला सुरुवात केली माझ्या नाती त्यांच्या आजीची अजूनही वाट पाहत आहे त्यांना कल्पनाही नाही की मोठा अपघात झाला आहे," असंही व्होरा यांनी सांगितले.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडिया