शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

Yasin Malik: 'होय, मी दहशतवादी कारवायांमध्ये सामील होतो', यासीन मलिकने कोर्टासमोर मान्य केले सर्व गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 10:37 IST

Yasin Malik: जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता मोहम्मद यासीन मलिक याने दिल्ली एनआयए कोर्टात दहशतवादाशी संबंधित सर्व गुन्ह्यांची कबुली दिली आहे. 19 मे रोजी त्याच्या शिक्षेवर सुनावणी होईल.

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता मोहम्मद यासीन मलिक (Yasin Malik) याने दिल्ली एनआयए कोर्टात दहशतवादाशी संबंधित सर्व गुन्ह्यांची कबुली दिली आहे. मलिक याच्यावर दिल्ली उच्च न्यायालयात बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (UAPA) यासह दहशतवादाशी संबंधित अनेक खटले दाखल आहेत. विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह या प्रकरणावर 19 मे रोजी सुनावणी करणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मलिक त्याच्यावरील आरोपांना आव्हान देणार नाही. मलिकवर भारतीय दंड संहितेच्या कलम 16 (दहशतवाद कायदा), कलम 17 (दहशतवादासाठी निधी), कलम 18 (दहशतवादाचा कट रचणे) आणि कलम 20 (दहशतवादी टोळीचा सदस्य) असे आरोप ठेवण्यात आले आहेत. यासोबतच त्याच्यावर UAPA, 120B (गुन्हेगारी कट) आणि 124A (देशद्रोह) देखील लावण्यात आले आहेत.

19 मे रोजी शिक्षेवर निकालविशेष न्यायाधीश प्रवीण सिंह 19 मे रोजी यासिन मलिकच्या गुन्ह्याची शिक्षा सुनावणार आहेत. या प्रकरणांमध्ये मलिकला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. दरम्यान, विशेष न्यायालयाने काश्मिरी फुटीरतावादी फारुख अहमद दार उर्फ ​​बिट्टा कराटे, शाबीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद बट्ट, जहूर अहमद यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. वताली, शाबीर अहमद शाह, अब्दुल रशीद शेख आणि नवलकिशोर कपूर यांच्याविरुद्ध आरोपपत्रे आहेत. लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी म्होरक्या हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा सय्यद सलाहुद्दीन यांच्यावरही आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerrorismदहशतवादCourtन्यायालय