शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

Yasin Malik: यासिन मलिक दोषी, दहशतवादी कारवायांची कबुली; 25 मे रोजी शिक्षेवर सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 13:17 IST

Yasin Malik: एनआयएच्या विशेष न्यायालयाने यासिल मलिकला दोषी ठरवले आहे.

Yasin Malik Convicted: जम्मू-काश्मीरातील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. आता 25 मे रोजी यासिन मलिकच्या शिक्षेवर चर्चा होईल. दरम्यान, मलिकवरील आरोपांचा तीव्र निषेध करत पाकिस्तानने भारतीय दूतावासाच्या प्रभारींना निवेदन सोपवले आहे.

पाकिस्तानचे निवेदनकाश्मिरी नेतृत्वाचा आवाज दाबण्यासाठी भारत सरकारने यासिल मलिकला खोट्या प्रकरणात अडकवल्याबद्दल पाकिस्तानने भारतीय दूतावासाकडे गंभीर चिंता व्यक्त केल्याचे निवेदनात म्हटले आहे. 2019 पासून अमानवीय परिस्थितीत तिहार तुरुंगात मलिकच्या नजरकैदेबद्दलही पाकिस्तानने दिलेल्या निवेदनात भाष्य केले आहे.

मलिकने स्विकारले गुन्हेपरराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानने भारत सरकारला मलिकची सर्व आरोपातून मुक्तता करण्याची आणि तुरुंगातून तात्काळ सुटका करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मलिकने काश्मीर खोऱ्यात अशांतता निर्माण करणाऱ्या कथित दहशतवाद आणि फुटीरतावादी कारवायांची कबुली दिली आहे. मलिकवर बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (UAPA) आणि विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत.

मलिकवर भारतीय दंड संहितेच्या कलम 16 (दहशतवाद कायदा), कलम 17 (दहशतवादासाठी निधी), कलम 18 (दहशतवादाचा कट रचणे) आणि कलम 20 (दहशतवादी टोळीचा सदस्य) असे आरोप ठेवण्यात आले आहेत. यासोबतच त्याच्यावर UAPA, 120B (गुन्हेगारी कट) आणि 124A (देशद्रोह) देखील लावण्यात आले आहेत.

मलिकला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते

यासीनवर ज्या कलमांमध्ये गुन्हा दाखल आहे, अशा प्रकरणात त्याला जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. यासीन मलिक काश्मीरच्या राजकारणात सक्रिय होता. तरुणांना भडकावण्यात आणि दहशतवादी कारवायांमध्ये सामील करण्यात त्याचा महत्त्वाचा हात मानला जातो. मलिक जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) शी संबंधित आहे. 2019 मध्ये केंद्र सरकारने JKLF वर बंदी घातली होती. यासीन मलिकवर 1990 मध्ये हवाई दलाच्या 4 जवानांची हत्या केल्याचा आरोप आहे, ज्याची त्याने कबुली दिली आहे. मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिचे अपहरण केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.

 

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरCourtन्यायालयPakistanपाकिस्तान