यशवंतपूर-पंढरपूर विशेष गाडी आता आठवड्यातून दोन दिवस धावणार

By Admin | Updated: June 2, 2015 01:14 IST2015-06-02T01:14:15+5:302015-06-02T01:14:15+5:30

सोलापूर : प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता यशवंतपूर-पंढरपूर विशेष गाडी आता आठवड्यातून दोन दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वे, सोलापूर विभागाने घेतला आहे़ सोमवार आणि गुरुवार असे दोन दिवस ही गाडी धावणार आहे़ २ जुलै ते ३१ ऑक्टोबर या मर्यादित कालावधीसाठी ही गाडी धावणार आहे़

Yashwantpur-Pandharpur special train will now run for two days a week | यशवंतपूर-पंढरपूर विशेष गाडी आता आठवड्यातून दोन दिवस धावणार

यशवंतपूर-पंढरपूर विशेष गाडी आता आठवड्यातून दोन दिवस धावणार

लापूर : प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता यशवंतपूर-पंढरपूर विशेष गाडी आता आठवड्यातून दोन दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वे, सोलापूर विभागाने घेतला आहे़ सोमवार आणि गुरुवार असे दोन दिवस ही गाडी धावणार आहे़ २ जुलै ते ३१ ऑक्टोबर या मर्यादित कालावधीसाठी ही गाडी धावणार आहे़
यशवंतपूर-पंढरपूर ही विशेष गाडी (०६५४१) ही यशवंतपूर स्थानकावरून सायंकाळी ६ वाजता सुटेल़ तुमकूर, अर्सिकेरे, दावणगिरीमार्गे हुबळीला येईल़ पुढे धारवाड, बेळगाव, कुडाची, मिरज, कवठेमहांक ाळ, ढालगाव ही स्थानके पार करीत सांगोला स्थानकावर आणि तेथून पंढरपूर स्थानकावर दुसर्‍या दिवशी सकाळी ११़३५ वाजता आगमन होईल़
तसेच पंढरपूरहून ही विशेष गाडी (०६५४२) मंगळवार आणि शुक्रवार धावणार आहे़ ३ जुलै ते ३० ऑक्टोबरदरम्यान ही गाडी धावणार आहे़ दुपारी १़३५ वाजता पंढरपूर स्थानकावरून ही गाडी सुटेल़ मिरज, कुडाची, बेळगाव, धारवाडमार्गे हुबळी स्थानकावर गाडी येईल़ यपुढे दावणगिरी, अर्सिकेरे, तुमकूर स्थानकावरून यशवंतपूर स्थानकावर दुसर्‍या दिवशी सकाळी ६़२० वाजता आगमन होईल़ (प्रतिनिधी)
२१ कोचेसची गाडी
या विशेष गाडीला २१ कोचेस असणार आहेत़ सोलापूर विभागात कुर्डूवाडी-मिरज सेक्शनमध्ये बोहाळी आणि गुळवंची स्टेशन तत्कालीन प्रभावाने बंद करण्यात येत आहे़

Web Title: Yashwantpur-Pandharpur special train will now run for two days a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.