यारी फुटबॉल चषक आजपासून

By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:35+5:302015-08-19T22:27:35+5:30

मडगाव : कुंकळ्ळी युनियन स्पोर्ट्स क्लबतर्फे ‘यारी प्रीमियर चषक फुटबॉल’ स्पर्धेला गुरुवारपासून (दि. 20) कुंकळ्ळी येथील सरकारी शाळेच्या मैदानावर सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील शुभारंभीचा सामना 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून पॅरीश युथ नुवे व चांदोर क्लब यांच्यात होईल. स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख 50 हजार व चषक, उपविजेत्या संघाला 35 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Yari Football Cup from today | यारी फुटबॉल चषक आजपासून

यारी फुटबॉल चषक आजपासून

गाव : कुंकळ्ळी युनियन स्पोर्ट्स क्लबतर्फे ‘यारी प्रीमियर चषक फुटबॉल’ स्पर्धेला गुरुवारपासून (दि. 20) कुंकळ्ळी येथील सरकारी शाळेच्या मैदानावर सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील शुभारंभीचा सामना 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून पॅरीश युथ नुवे व चांदोर क्लब यांच्यात होईल. स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख 50 हजार व चषक, उपविजेत्या संघाला 35 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
सहभागी संघ खालीलप्रमाणे : उतोर्डा स्पोर्ट्स क्लब, स्पोर्टिंग क्लब ऑफ दवर्ली, युनियन ऑफ चिंचणी व्हिलेर्जस, युनायटेड क्लब ऑफ बाणावली, वार्का स्पोर्ट्स क्लब, सां जुझे दी अरियाल, डॉन बॉस्को ओरॅटरी, रोस्मन क्रुझ ऑफ नागोवा, आंबेली स्पोर्ट्स क्लब, राय स्पोर्टिंग क्लब, नावेली व्हिलेर्जस युनियन व इतर संघांचा समावेश असणार आहे. वरील सर्व संघ दक्षिण गोवा र्मयादित आहेत, तर उत्तर गोवा विभागासाठी संघांची लढत 17 सप्टेंबरपासून आगशी येथील मैदानावर सुरू होणार आहे.

Web Title: Yari Football Cup from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.