हुडकेश्वरमधील जुगार अड्ड्यावर धाड
By Admin | Updated: July 7, 2015 01:05 IST2015-07-07T01:05:28+5:302015-07-07T01:05:28+5:30
नागपूर : हुडकेश्वर खुर्द शिवारातील जेवार शाळेजवळच्या शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड घालून पोलिसांनी ११ जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून ४० हजाराच्या रकमेसह ३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हुडकेश्वरमधील जुगार अड्ड्यावर धाड
न गपूर : हुडकेश्वर खुर्द शिवारातील जट्टेवार शाळेजवळच्या शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड घालून पोलिसांनी ११ जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून ४० हजाराच्या रकमेसह ३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.शाळेजवळच्या शेतात मोठा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त ईशू सिंधू यांच्या पथकाला मिळाली. त्यावरून रविवारी सायंकाळी ४.४५ वाजता पोलीस पथकाने जुगार अड्ड्यावर धाड घातली. तेथे प्रफुल्ल रहमान कोमके, सचिन रवींद्र पाचकवडे, नितीन महादेव निळगुळकर, पराग भास्कर मेश्राम, नरेश गजानन निंबार्ते, जितेंद्र उत्तमराव केवतकर, गणेश नानाजी नरड, विजय रामकृष्ण गोटेकर, राहुल प्रभाकर घाटे, सुनील पुंडलिकराव शेंडे आणि शेषराव भाऊराव कदम हे ताशपत्त्यावर पैशाची बाजी लावून जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३९,९५० रुपये, ११ मोबाईल, दुचाकी आणि अन्य साहित्यासह ३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. ----