याकूबला फाशी नव्हे, माफी द्या!

By Admin | Updated: July 22, 2015 23:53 IST2015-07-22T23:53:24+5:302015-07-22T23:53:24+5:30

मुंबईतील मार्च १९९३ मधील भीषण बॉम्बस्फोट खटल्यातील फाशी झालेला एकमेव कैदी याकूब मेमन याला फासावर न लटकविता दयेचा अर्ज मंजूर करून

Yakub is not hanged, sorry! | याकूबला फाशी नव्हे, माफी द्या!

याकूबला फाशी नव्हे, माफी द्या!

नवी दिल्ली : मुंबईतील मार्च १९९३ मधील भीषण बॉम्बस्फोट खटल्यातील फाशी झालेला एकमेव कैदी याकूब मेमन याला फासावर न लटकविता दयेचा अर्ज मंजूर करून त्याला माफी देण्यात यावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ‘क्युरेटिव्ह’ याचिका फेटाळल्यानंतर आधी ठरल्याप्रमाणे आता ३० जुलै रोजी नक्की फाशी होणार अशी शक्यता वर्तविली जात असतानाच याकूबने आता शेवटचा प्रयत्न म्हणून राष्ट्रपतींकडे स्वत: दयेचा अर्ज करण्याचे ठरविले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने म्हटले आहे की, या बॉम्बस्फोेटांच्या कारस्थानामागील देशातून पळून गेलेले मुख्य सूत्रधार अद्यापही मोकाटच आहेत. त्या उलट याकूब मेमन स्वत:हून देशात परत येऊन पोलिसांच्या स्वाधीन झाला, तो खटल्याला सामोरा गेला व त्याने खटला सिद्ध होण्यासाठी महत्त्वाची माहितीही दिली.
असे असूनही इतर सर्वांची फाशी रद्द होऊन त्याला एकट्यालाच फाशी सुनावली गेली. अशा परिस्थितीत याकूबला फाशी न देता त्याला माफी देणेच अधिक न्यायाचे होईल, असे पक्षाचे म्हणणे आहे.
मार्क्सवादी पक्षाने आपल्या या मागणीच्या समर्थनार्थ राजीव गांधींच्या खुन्यांची फाशी रद्द करून त्यांना दिल्या गेलेल्या जन्मठेपेचाही हवाला दिला आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Yakub is not hanged, sorry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.