यड्रावमध्ये मार्गाच्या साईड प˜्यात मुरूमा ऐवजी मातीचा भराव

By Admin | Updated: May 12, 2014 19:48 IST2014-05-12T19:48:19+5:302014-05-12T19:48:19+5:30

In the Yadrave, fill the soil instead of Muruma in the side of the road | यड्रावमध्ये मार्गाच्या साईड प˜्यात मुरूमा ऐवजी मातीचा भराव

यड्रावमध्ये मार्गाच्या साईड प˜्यात मुरूमा ऐवजी मातीचा भराव

>* विरोधानंतरही काम सुरू राहिल्याने संताप
यड्राव : येथील फाटा ते शिरोळ रस्त्यापर्यंत केलेल्या डांबरी रस्त्याच्या साईड प˜ीमध्ये मुरूमा ऐवजी मातीचा भराव टाकल्याने नागरीकातून संताप व्यक्त होत आहे. मातीचा भराव टाकण्यास ग्रामस्थांनी विरोध करूनही त्याचा उपयोग झाला नाही. याबाबत अभियंता गुळवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
यड्राव फाटा ते शिरोळ रस्ता हा फेर डांबरीकरणाचे काम सुमारे दोन महिन्यापुर्वी पूर्ण झाले आहे. या डांबरीकरणाच्या दोन्ही बाजूस सुमारे सात ते आठ इंच इतका सखल भाग आहे. सर्वत्र वाहनांसह दुचाकी वाहनाना याचा अडथळा होत होता. काही दुचाकीस्वार अपघात ग्रस्तही झाले आहेत. यामुळे लवकर दोन्ही बाजूच्या साईड प˜्या भरावाची मागणी ग्रामस्थामधून होत होती.
दोन दिवसापूर्वी या साईड प˜ीचा भरावाचे काम सुरू झाले. रस्त्याच्या कडेचीच माती उकरून त्याचाच भराव टाकण्यात आला आहे तसेच या भरावासाठी मातीचा वापर केला आहे. निकृष्ठ दर्जाचा मुरूम असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने मुरूम टाकण्यास कर्मचार्‍यांना विरोध केला, मात्र ते ऐकत नसल्याचे पाहून ग्रा.प.सदस्य सदाशिव कोरवी यांना बोलावून घेतले. त्यांनीही निकृष्ठ दर्जा असलेला मुरूम टाकू नये व काम बंद करा असे सांगितले. तरीही संबधितांनी काम न थांबवता मुरूम पसरला. बर्‍याच ठिकाणी रस्त्याच्या बाजूकडील असलेल्या जमीनीतून जेसीबीच्या सहाय्याने माती उकरून तीचाही भराव टाकण्यात आला आहे.
संबधित प्रकाराची माहिती अभियंता गुळवे यांना विचारले असता. बैठक सुरू आहे, नंतर बोलू असे सांगून नंतर फोन स्विकारला नाही. एखादा पाऊस पडलातरी साईट प˜ीची माती निघून जाईल पून्हा सखल भाग राहिल्यास धोकादायक ठरू शकतो. या करीता चांगल्या प्रतीचा मुरूम साईट प˜ीमध्ये भराव करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
चौकट - ग्रामस्थांच्या जिवीताची खबरदारी घ्यावी
सरपंच सरदार सुतार यांनी अभियंता गुळवे यांना साईड प˜ीच्या निकृष्ठ कामाची माहिती सांगितली व ग्रा.प. सदस्य सदाशिव कोरवी यांनी काम बंद करून चांगला मुरूम टाकण्याची संबंधिताना सूचना करूनही निकृष्ठ काम सुरू ठेवल्याने ग्रामस्थाच्या जिवीतास धोका असून त्याची खबरदारी घ्यावी, असे सांगितले आहे.
(वार्ताहर)

Web Title: In the Yadrave, fill the soil instead of Muruma in the side of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.