बंगळुरू : माझे सरकार उलथविण्यासाठी जनता दल (एस)च्या आमदाराला भाजपा प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी प्रलोभने दाखविल्याचा आरोप मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी शुक्रवारी केला. त्याच्या दोन ध्वनिफितीही त्यांनी पत्रकार परिषदेत उघडकेल्या. मात्र या ध्वनिफितीबनावट असल्याचा दावा येडियुरप्पांनी केला.मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या संमतीनेच ही कारस्थाने रचण्यात येत असल्याचा आरोप कुमारस्वामींनी केला. ते म्हणाले की, आपणच या देशाचे रक्षणकर्ते आहोत असा दावा करणाऱ्या मोदींना या ध्वनिफिती पाठविण्यात येतील. यातून मोदींचा चेहरा उघड झाला आहे.
माझे सरकार पाडण्यासाठी येडियुरप्पांची लालूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 04:57 IST