यादव यांनी पदभार स्वीकारला

By Admin | Updated: June 2, 2015 16:18 IST2015-06-01T22:13:13+5:302015-06-02T16:18:51+5:30

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी परिक्षीत यादव यांची नियुक्ती झाली असून, सोमवारी त्यांनी पदभार स्वीकारला़ यादव हे श्रीरामपूर पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते़

Yadav accepted the charge | यादव यांनी पदभार स्वीकारला

यादव यांनी पदभार स्वीकारला

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी परिक्षीत यादव यांची नियुक्ती झाली असून, सोमवारी त्यांनी पदभार स्वीकारला़ यादव हे श्रीरामपूर पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते़
सामान्य प्रशासन विभागाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांची ठाणे येथे बदली झाल्यानंतर हे पद गेल्या महिनाभरापासून रिक्त होते़ स्वच्छता विभागाच्या उज्ज्वला बावके यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला होता़ आता यादव यांची नियुक्ती झाल्याने या विभागाला पूर्णवेळ अधिकारी मिळाला असून, रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत़ पदभार स्वीकारल्यानंतर यादव यांचे जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले़ यावेळी विजय कोरडे, सुभाष कराळे, विकास साळुंके, शशिकांत रासकर, गणेश पवार, प्रशांत मोरे आदी उपस्थित होते़
फोटो १ झेडपी नावाने

Web Title: Yadav accepted the charge