यात्रेत बैल उधळले; एकाचा मृत्यू

By Admin | Updated: February 5, 2015 22:32 IST2015-02-05T22:32:15+5:302015-02-05T22:32:15+5:30

पाईट : देवतोरणे येथील माघ पौर्णिमेच्या यात्रेत बिचकून उधळलेल्या बैलाने देवदर्शनाला आलेल्या यात्रेकरूला तुडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

The yachts blew; One death | यात्रेत बैल उधळले; एकाचा मृत्यू

यात्रेत बैल उधळले; एकाचा मृत्यू

ईट : देवतोरणे येथील माघ पौर्णिमेच्या यात्रेत बिचकून उधळलेल्या बैलाने देवदर्शनाला आलेल्या यात्रेकरूला तुडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
रामभाऊ किसन केदारी (हेद्रु्रुज, खेड) असे त्या यात्रेकरूचे नाव आहे. देवतोरणे येथे भैरवनाथ महाराजांची मोठी यात्रा भरली होती. यात्रेला शेतकरी बैलांनाही कुलदैवताच्या दर्शनाला घेऊन येतात. मंदिराच्या सभामंडपासमोरून बैलांना दर्शन घेऊन जात असताना समोर फडकत असलेल्या झेंड्याला बिचकून एका बैलाने उडी मारली. त्याच्या शिंगामध्ये छत्री अडकाल्याने इतर बरोबर असलेले सर्वच बैल बेभान होऊन उधळले. यात केदारी यांना बैलाने तुडवले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले; परंतु त्याचा उपयोग झाला नाही. अनेक दुकानांचेही यात नुकसान झाले.


संपादन: बापू बैलकर

Web Title: The yachts blew; One death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.