जिओ धमाका! प्राईम टाईममध्येही जिओ टीव्हीची एन्ट्री?
By Admin | Updated: April 4, 2017 18:58 IST2017-04-04T14:12:26+5:302017-04-04T18:58:48+5:30
भारतीय दुरसंचार क्षेत्रात धमाल उडवून दिल्यानंतर रिलायन्स जिओ आणखी एक धमाका करण्यास सज्ज

जिओ धमाका! प्राईम टाईममध्येही जिओ टीव्हीची एन्ट्री?
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - भारतीय दूरसंचार क्षेत्रात धमाल उडवून दिल्यानंतर रिलायन्स जिओ आणखी एक धमाका करण्यास सज्ज आहे. कंपनी आता DTH सर्विस लॉन्च करणार असल्याचं वृत्त आहे. जिओच्या सेट टॉप बॉक्सचे काही फोटो लीक झाले आहेत. त्यामुळे जिओ DTH सर्विस लॉन्च करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
यापुर्वीही जिओ सेट टॉप बॉक्स लॉन्च करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, आता लीक झालेल्या फोटोंमुळे जिओच्या DTH सर्विसबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. जिओ IP आधारित टीव्ही सर्विस सुरू कऱणार असल्याचं बोललं जात आहे. फोटोमध्ये दिसत असलेल्या सेट टॉप बॉक्सच्या रिमोटमध्ये माईकचं बटन दिसत आहे त्यामुळे यामध्ये व्हॉइस कमांड देण्याचा पर्याय असण्याची शक्यता आहे.