चुकीचं राष्ट्रगीत गायल्याद्दल सनी लिओनी विरोधात तक्रार!
By Admin | Updated: July 22, 2016 21:22 IST2016-07-22T21:18:56+5:302016-07-22T21:22:00+5:30
राष्ट्रगीतात चुकीच्या शब्दांचा वापर केला म्हणून सनीवर पूर्व दिल्लीत अशोक नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

चुकीचं राष्ट्रगीत गायल्याद्दल सनी लिओनी विरोधात तक्रार!
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ : बॉलीवूडमध्ये अल्पावधीतच जम बसवलेल्या सनी लिओनींवर राष्ट्रगीत चुकीचं म्हटल्याचे आरोप होत आहेत, राष्ट्रगीतात चुकीच्या शब्दांचा वापर केला म्हणून सनीवर पूर्व दिल्लीत अशोक नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुरवारी प्रो-कबड्डी लीग सामन्याच्या वेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होती. तिच्या सोबत पती डेनियल वेबरही उपस्थित होता.
प्रो कबड्डीच्या जयपूर पिंक पँथर आणि दबंग दिल्ली या सामन्यादरम्यान सनी उपस्थित होती. गुन्हा दाखल करणाऱ्या उल्लास याच्यामते सनीने राष्ट्रगीत गाताना सिंध ऐवजी सिंधु असा उच्चार केला होता. आणि हा उच्चार चुकिचा आहे. दरम्यान सनीने राष्ट्रगीत झाल्यानंतर ट्विट करत आपल्या भावना मांडल्या होत्या. ट्विट मध्ये ती म्हणाली होती, राष्ट्रगीत गायल्याचा मला गर्व आहे. राष्ट्रगीत गाताना मी थोडीसी नर्वस झाली होती. राष्ट्रगीत म्हणण्यासाठी आधी मला सराव करावा लागला होता.
तक्रार दाखल करणाऱ्या नुसार, सनी लिओनाने चुकीच्या पद्धतीने राष्ट्रगीत म्हटले आहे. राष्ट्रगीत सुरु असताना कॅमेरा इकडे तिकडे जात होता. भारतीय राष्ट्रगीताचा किमान ५२ सेकंदापर्यंत सन्मान केला पाहिजे.