शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

भाजपाकडून सत्याची अपेक्षा ठेवणे चुकीचेच, कर्नाटकात राहुल गांधी यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:40 AM

भाजपा हा खोटे बोलणाºया मंडळींचा पक्ष असून, त्यांच्याकडून तुम्ही सत्याची अपेक्षा ठेवूच शकत नाही, तरुणांना रोजगार, शेतक-यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव, काळ्या पैशाला आळा, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये अशी सारीच भाजपा व नरेंद्र मोदी यांची आश्वासने खोटी ठरली आहेत, अशी टीका करीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील निवडणूक प्रचाराची शनिवारी सुरुवातच केली.

बेल्लारी : भाजपा हा खोटे बोलणाºया मंडळींचा पक्ष असून, त्यांच्याकडून तुम्ही सत्याची अपेक्षा ठेवूच शकत नाही, तरुणांना रोजगार, शेतक-यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव, काळ्या पैशाला आळा, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये अशी सारीच भाजपा व नरेंद्र मोदी यांची आश्वासने खोटी ठरली आहेत, अशी टीका करीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील निवडणूक प्रचाराची शनिवारी सुरुवातच केली.कर्नाटकातील निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या, तरी तिथे काँग्रेस व भाजपा दोघांनीही प्रचार सुरू केला आहे. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेऊ न कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर टीका केली होती. त्याचा थेट उल्लेख न करताच, सिद्धरामय्या सरकारने राबवलेल्या अनेक विकास कामे व योजनांविषयी बोलताना राहुल गांधी यांनी भाजपाने दिलेली आश्वासने कशी खोटी ठरली, हे नमूद केले.भाषणाची सुरुवात कानडीतून करून, नंतर हिंदीत भाषण करताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकवार राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला. ही विमाने केवढ्याला विकत घेतली, हे सांगायलाही मोदी सरकार तयार नाही, त्यामुळेच त्यात भाजपा सरकारने घोटाळा केला असल्याची शंका घ्यायला वाव आहे, असे सांगून ते म्हणाले की, त्या व्यवहाराची माहिती देण्याचे आश्वासन आधी सरकारने दिले होते. आता मात्र गोपनीयतेचे कारण पुढे करून जाणीवपूर्वक माहिती लपवली जात आहे.गेल्या पाच वर्षांत कर्नाटकात विकास कामे व अनेक योजना राबविणारा काँग्रेस पक्ष आणि स्वत:ची आश्वासने न पाळणारा भारतीय जनता पक्ष यापैकी एकाची निवड राज्यातील जनतेने करायची आहे. कर्नाटकातील जनता सूज्ञ आहे. ती पु्न्हा काँग्रेसलाच विजयी करेल, अशी खात्री आपणास आहे, असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, गुजरातमध्ये २00२ साली झालेल्या दंगली कर्नाटकातील लोकांनी पाहिल्याच आहेत. त्यांना आपल्या राज्यात असे वातावरण निश्चितच नको आहे. बेल्लारीच्या खाणींची लूट भाजपा सरकारच्या काळात कशी झाली, याचा त्यांनी उल्लेख केला. खाणमाफिया रेड्डी बंधू यांना भाजपाचा कसा पाठिंबा होता, हे सर्वांना माहीत झाले आहे. कर्नाटकचे तत्कालिन लोकायुक्त न्या. संतोष हेगडे यांनीही त्यावर ठपका ठेवला होता, असे राहुल गांधी म्हणाले. (वृत्तसंस्था)बेल्लारीशी जुने नातेबेल्लारी मतदारसंघाशी आपले जुने नाते आहे, याचा उल्लेख करून देताना राहुल गांधी यांनी आपल्या मातोश्री सोनिया गांधी यांना १९९९ साली येथील जनतेने मोठ्या बहुमताने निवडून दिले होते, याची आठवण करून दिली. बल्लारीतील विधानसभेच्या सर्व ९ जागांवर काँग्रेसच विजयी होईल, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीKarnatakकर्नाटक