बनावट ईमेलविरोधात हृतिकची तक्रार राकेश मारिया यांना लिहिले पत्र

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:18+5:302014-12-12T23:49:18+5:30

बनावट ईमेलविरोधात हृतिकची तक्रार

Written letter to Rakesh Maria, Hrithik's complaint against fake email | बनावट ईमेलविरोधात हृतिकची तक्रार राकेश मारिया यांना लिहिले पत्र

बनावट ईमेलविरोधात हृतिकची तक्रार राकेश मारिया यांना लिहिले पत्र

ावट ईमेलविरोधात हृतिकची तक्रार
राकेश मारिया यांना लिहिले पत्र

मुंबई। दि. १२ (प्रतिनीधी)
............................................

अभिनेता हृतिक रोशनने मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना पत्र पाठवून आपल्या नावे बनावट ईमेल अकाऊन्ट उघडणार्‍या अनोळखी व्यक्तीची तक्रार केली आहे.
या बनावट ईमेल अकाउन्टद्वारे ही व्यक्ती हृतिक म्हणून बॉलीवूडमधील प्रतिष्ठीत व्यक्ती आणि चाहत्यांशी संवाद साधते. बॉलीवूडमधूनच ही बाब माझ्या लक्षात आली. मी या सर्वांना संबंधील ईमेल आयडी माझा नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा विश्वास बसला नाही. या बनावट ईमेलमुळे सर्वांचीच फसवणूक सुरू आहे, असे हृतिकने या पत्रात लिहिले आहे. हे बनावट ईमेल आयडी तात्काळ बंद करावे आणि ते तयार करणार्‍याविरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी विनंतीही त्याने आयुक्तांना केली आहे.
हृतिकच्या तक्रारीवर चौकशी सुरू आहे, अशी माहिती आयुक्त मारिया यांनी माध्यमांना दिली. तर पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास असून लवकरच बनावट ईमेल आयडी तयार करणारा गजाआड असेल, अशी प्रतिक्रिया हृतिकचे वकील ॲड. दिपेश मेहता यांनी व्यक्त केली.

Web Title: Written letter to Rakesh Maria, Hrithik's complaint against fake email

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.