शाळेत घडय़ाळ घातले म्हणून मनगट कापले
By Admin | Updated: September 5, 2014 09:32 IST2014-09-05T03:12:06+5:302014-09-05T09:32:30+5:30
तामिळनाडूच्या विरुद्धनगर जिल्हय़ातील थिरुथंगल येथील शाळेत शिकणा:या 16 वर्षाच्या दलित मुलाचे मनगट शाळेतील वैमनस्यापायी कापल्याची घटना येथे घडली.

शाळेत घडय़ाळ घातले म्हणून मनगट कापले
मदुराई : तामिळनाडूच्या विरुद्धनगर जिल्हय़ातील थिरुथंगल येथील शाळेत शिकणा:या 16 वर्षाच्या दलित मुलाचे मनगट शाळेतील वैमनस्यापायी कापल्याची घटना येथे घडली.
रमेश नावाचा हा मुलगा येथील शाळेत अकरावीत शिकत असून त्याने हातात घडय़ाळ घातल्यावरून त्याला त्याच्या शाळेतील वरच्या वर्गात शिकणा:या काही मुलांनी हटकले.
त्यांनी त्याच्या हातातील घडय़ाळ काढून घेऊन फेकून दिले. यामुळे चिडलेल्या रमेशने त्यांच्यासोबत मारामारी केली व त्यामुळे शाळेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेच्या दोन दिवसानंतर बुधवारी रात्री रमेश रेल्वेस्थानकाजवळून जात असताना 15 मुलांच्या टोळक्याने त्याला रोखले व त्याचे मनगट चाकूने कापले. त्या ठिकाणाहून स्वत:ची सुटका करून घेऊन या मुलाने रुग्णालय गाठले. नंतर त्याला शिवकाशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या शाळेत दलित मुलांवर दलितेतर विद्यार्थी अत्याचार करीत असल्याच्या अनेक घटना सांगितल्या जातात. ज्यात दलित विद्यार्थी चपला घालून येतात त्याबद्दलही त्यांना ही मुले टोमणो मारत असल्याचे सांगितले जाते.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. (वृत्तसंस्था)