शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक छळाचा पुरावा मागितल्याने साक्षी मलिक संतापली; पैलवानांनी पदके परत करण्याचे दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 16:58 IST

Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत.

brij Bhushan Singh । नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधातील आंदोलक पैलवानांची आखाड्याबाहेरील कुस्ती अद्याप सुरूच आहे. २३ एप्रिलपासून पैलवान आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनातील प्रमुख चेहरा साक्षी मलिक असून तिने ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले की, या अशा ताकदवान व्यक्तीच्या विरोधात जाण्यासाठी खूप हिम्मत लागते. याशिवाय लैंगिक छळाचा पुरावा मागितल्याचा उल्लेख देखील यावेळी साक्षीने केला.

साक्षी मलिकने म्हटले की, आम्ही आता निर्णय घेतला आहे की, लैंगिक छळ करणाऱ्यांविरूद्ध बोलण्याची वेळ आलेली आहे. तिने सांगितले की, अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना धमकावले जात असून ज्या शाळेत ती शिकते, तिथे तिची जन्मतारीख बदलण्याचा प्रयत्न झाला. जेणेकरून हे समोर येऊ शकेल की ती अल्पवयीन मुलगी नाही.

तपासात मागितले पुरावे मलिकने सांगितले की, समितीच्या सदस्यांनी फोटो आणि रेकॉर्डिंगसारखे पुरावे मागितले आहेत. "पीडितांनी सांगितले की, अशी घटना कोणासोबत झाली असेल तर ती संबंधित पीडितेला आधी कशी माहिती असेल? जर कोणत्या महिलेला माहिती असेल की, तिचा लैंगिक छळ होणार आहे तर ती त्या ठिकाणी जाणारच नाही. जर महिला सांगत असेल तिचा लैंगिक छळ झाला आहे, तर हाच सर्वात मोठा पुरावा आहे. कोणतीच महिला असे खोटे आरोप करणार नाही. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, पोलिसांकडून योग्य तपास केला जाईल", असे साक्षी मलिकने स्पष्ट केले. 

खेळाडू  परत करणार?आंदोलकांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण यांना अटक न केल्यास पदके परत करण्याचे संकेत दिले आहेत. साक्षी मलिकने म्हटले, "भारत सरकारने आम्हाला हे अवॉर्ड्स दिले आहेत. पण कारवाई झाली नाही तर याचा काय उपयोग? आम्ही मागील २५ दिवसांपासून जंतरमतरवर बसलो आहोत. त्यामुळे जर आमच्या तक्रारी ऐकल्या जात नसतील तर पदके किंवा अवॉर्डस यांचा काय उपयोग."

 

 

टॅग्स :Wrestlingकुस्तीBJPभाजपाNew Delhiनवी दिल्ली