शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Wrestler Protest: 'राज्याभिषेक पूर्ण झाला, अहंकारी राजा'; पैलवानांच्या आंदोलनावरुन राहुल गांधीची PM मोदींवर खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 17:16 IST

Wrestler Protest : जंतरमंतरवरील पैलवानांना पोलिसांनी पकडल्यानंतर राहुल गांधींनी केंद्रावर निशाणा साधला.

Wrestler Protest: रविवारी (28 मे 2023) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे (New Parliament Building) उद्घाटन करण्यात आले. यासोबतच दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली. जंतरमंतरहून नवीन संसद भवनाकडे कूच करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतले. पैलवानांचा तंबूही काढून टाकण्यात आला. याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटरवर कुस्तूपटूंना पोलीस पकडत असल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच म्हणाले की, "राज्याभिषेक पूर्ण झाला - 'अहंकारी राजा' रस्त्यावर जनतेचा आवाज चिरडत आहे." नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक आणि भाजप सरकारमध्ये वाद सुरू होता. नवीन संसदेचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते न करता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे, अशी विरोधकांची इच्छा होती.

प्रियंका गांधीची टीकाकुस्तीपटूंच्या समर्थनार्थ काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विट केले की, ''खेळाडूंच्या छातीवरील पदके ही आपल्या देशाची शान आहे. त्या पदकांसह खेळाडूंच्या मेहनतीमुळे देशाचा मान वाढतो. भाजप सरकारचा अहंकार इतका वाढला आहे की, सरकार निर्दयीपणे आपल्या महिला खेळाडूंचा आवाज बुटाखाली पायदळी तुडवत आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. सरकारचा अन्याय संपूर्ण देश पाहत आहे.''

मल्लिकार्जुन खर्गेंनीही ट्विट पाठिंबा दिलाकाँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही कुस्तीपटूंवर झालेल्या कारवाईबाबत ट्विट केले आहे. कुस्तीपटूंना पाठिंबा देत त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले- ''नव्या संसदेच्या उद्घाटनाचा अधिकार राष्ट्रपतींकडून काढून घेण्यात आला, महिला खेळाडूंना रस्त्यावर हुकूमशाहीने मारहाण करण्यात आली! भाजप-आरएसएसच्या सत्ताधाऱ्यांचे तीन खोटे आता देशासमोर उघड झाले आहेत. 1. लोकशाही, 2. राष्ट्रवाद, 3. बालिका वाचवा....मोदीजी लक्षात ठेवा.''

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदagitationआंदोलनJantar Mantarजंतर मंतर