शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! देशात दर 24 तासांमध्ये 28 विद्यार्थी करताहेत आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 14:37 IST

अभ्यासाचा वाढलेला दबाव आणि तणावामुळे विद्यार्थी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बंगळुरू - गेल्या काही काळात बदलत्या शिक्षणव्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांवरील तणाव हा कमालीचा वाढला आहे. अभ्यासाचा वाढलेला दबाव आणि तणावामुळे विद्यार्थी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या 2018 मधील आकडेवारीनुसार 2018 मध्ये दर 24 तासांना 28 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तसेच गेल्या 10 वर्षांत देशामध्ये सुमारे 82 हजार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. 2018 मध्ये सर्वाधिक 10 हजार विद्यार्थ्यांनी मृत्यूला कवटाळले होते.  1 जानेवारी 2009 पासून 31 डिसेंबर 2018 पर्यंत 81 हजार 758 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी 57 टक्के विद्यार्थ्यांनी गेल्या पाच वर्षांत आपले जीवन संपवले. तर 10 हजार 159 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. 2018 मध्ये भारतात एकूण 1 लाख 30 हजार लोकांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. त्यापैकी 8 टक्के हे विद्यार्थी होते. तर आत्महत्या करणारे जवळपास 10 टक्के हे बेरोजगार होते.  2018 मध्ये आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एक चतुर्थांश विद्यार्थ्यांनी परीक्षेत नापास झाल्याने जीवन संपवले.  सध्या विद्यार्थी अंमली पदार्थांचे व्यसन, ताणतणाव, कौटुंबिक समस्या आणि नातेसंबंध यामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे  तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जीवघेणी बेकारी; देशात दर 2 तासांत 3 बेरोजगारांच्या आत्महत्या 

JNU Attack : हल्ल्याच्या निषेधार्थ विद्यार्थी उतरले रस्त्यावर 

१५७ महाविद्यालयांकडून १२ कोटींची रक्कम वसूल; उच्च शिक्षण विभागाची मोठी कारवाई दरम्यान, २०१७-१८ वर्षात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या जास्त असल्याचं एनसीआरबीच्या आकडेवारीतून उघड झालं आहे. २०१८ मध्ये १२ हजार ९३६ जणांनी बेरोजगारीला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. याच कालावधीत १० हजार ३४९ शेतकरी आणि शेतमजूरांनी मृत्यूला कवटाळलं. देशात बेरोजगारीच्या संकटानं गंभीर स्वरुप धारण केल्याचं या आकडेवारीनं अधोरेखित केलं आहे.  एनसीआरबी गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी संस्था आहे. देशात घडणारे गुन्हे, आत्महत्या, त्यांच्या मागील कारणं यांची आकडेवारी नोंदवण्याचं काम एनसीआरबी करते. २०१८ मध्ये देशातल्या आत्महत्यांचं प्रमाण ३.६ टक्क्यांनी वाढल्याचं एनसीआरबीच्या आकडेवारीतून समोर आलं आहे. २०१८ मध्ये देशभरात १ लाख ३४ हजार ५१६ आत्महत्या झाल्या. तर २०१७ मध्ये २९ हजार ८८७ आत्महत्या झाल्या होत्या. 

टॅग्स :Studentविद्यार्थीSuicideआत्महत्याEducation Sectorशिक्षण क्षेत्रIndiaभारत