शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या भवितव्याबद्दल युवापिढीला वाटणारी चिंता योग्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 06:33 IST

सीताराम येचुरी; सुवर्णपदक नाकारणाऱ्या रबिहाचे केले कौतुक; धाडसी भारतीयांमागे सर्वांनी उभे राहायला हवे

नवी दिल्ली : देशाच्या भवितव्याबद्दल युवापिढीला वाटणारी चिंता अतिशय योग्य आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शने करणाºया विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेत पाँडेचरी विद्यापीठातील रबिहा अब्दुरहीम या विद्यार्थिनीने पाठिंबा दिला, तसेच शैक्षणिक गुणवत्तेबद्दल विद्यापीठाकडून मिळणारे सुवर्णपदक स्वीकारण्यास तिने नकार दिला, ही अतिशय योग्य कृती आहे, असे माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे.

रबिहा अब्दुरहिम ही विद्यार्थिनी मूळची केरळची असून, तिने पाँडेचरी विद्यापीठातून ‘मास कम्युनिशेकन’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी या विद्यापीठाच्या झालेल्या पदवीदान समारंभाला रबिहाला उपस्थित राहू देण्यात आले नव्हते. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शने करणाºया विद्यार्थ्यांना तिने पाठिंबा दर्शविला होता. सीताराम येचुरी यांनी टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, रबिहासारख्या धाडसी व देशभक्त भारतीयांमागे आपण सर्वांनी उभे राहायला हवे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शने करणाºया व भारतात शिकण्यासाठी आलेल्या एका जर्मन युवतीला हा देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.जनतेचा आवाज दडपला : ते म्हणाले की, राज्यघटनेमध्ये भारतीय संघराज्याची जी संकल्पना मांडली त्याच्या विसंगत चित्र सध्या दिसत नाही का? केंद्र सरकारने जनतेचा आवाज दडपण्याला काही मर्यादाच उरलेली नाही. मात्र, भारत व जगातील लोकांना नेमके काय चालले आहे, ते बरोबर माहिती आहे.

टॅग्स :IndiaभारतEconomyअर्थव्यवस्था