जगातील सर्वात मोठी दुर्बीण लडाखमध्ये ?
By Admin | Updated: March 27, 2016 14:14 IST2016-03-27T14:14:19+5:302016-03-27T14:14:19+5:30
भारतात लडाखमध्ये जगातील सर्वात मोठा दुर्बीण प्रकल्प उभा रहाण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील हवाई येथील माउना किआ हे या दुर्बीण प्रकल्पाच्या उभारणीसाठी पहिली पसंती होते.

जगातील सर्वात मोठी दुर्बीण लडाखमध्ये ?
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - भारतात लडाखमध्ये जगातील सर्वात मोठा दुर्बीण प्रकल्प उभा रहाण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील हवाई येथील माउना किआ हे या दुर्बीण प्रकल्पाच्या उभारणीसाठी पहिली पसंती होते. पण हवाईच्या सर्वोच्च न्यायालयाने तेथे प्रकल्प उभारायला परवानगी नाकारली आहे. ज्या जागेवर ही दुर्बीण उभारली जाणार आहे. ती जागा तिथे रहाणा-या लोकांसाठी पवित्र भूमी असल्याने हवाईच्या सर्वोच्च न्यायालयाने तिथे प्रकल्पाला परवानगी नाकारली.
तीस मीटर लांबीच्या दुर्बीणीसाठी टीएमटी बोर्डाने पर्यायी जागेचा शोध सुरु केला असून, टीमटीचे पथक जागेची चाचपणी करण्यासाठी लवकरच लडाख येथे येऊ शकते. हवाईमध्ये पुन्हा या प्रकल्पाला परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण टीएमटीला वेळ वाया घालवायचा नसून, त्यांनी पर्यायी जागेचा शोध सुरु केला आहे.
लडाखमधील हनले गावात ही दुर्बीण उभारली जाऊ शकते. लडाखमध्ये आधीपासूनच भारताची खगोल वेधशाळा आहे. भारतात लडाख आणि दक्षिण अमेरिकेतील देश चिली अशा दोन जागांचा विचार सुरु आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ९८.२६ कोटी रुपये आहे.