चंद्रशेखर बर्वेलोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठे आणि एकमेव बहुमजली ‘टॉयलेट टॉवर’ परदेशात नव्हे, तर भारतात बांधण्यात आले आहे. उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांनी ३५ वर्षांपूर्वी हरिद्वार येथे, तर १० वर्षांपूर्वी दिल्लीत तीन मजल्याच्या इमारती बांधल्या आहेत. यात केवळ शौचालय आहेत. दरवर्षी १९ नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस म्हणून पाळला जातो. स्वच्छ वातावरण व स्वच्छ पाण्यासाठी शौचालयाचा वापर करण्यास लोकांना प्रेरित करणे हा या मागचा हेतू आहे. या साठीच दिल्ली आणि हरिद्वार येथे केवळ शौचालय असलेले टॉवर बांधण्यात आले आहेत.
जुलै २०२४ पर्यंत १२ कोटींपेक्षा जास्त शौचालये बांधली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची धुरा सांभाळताच ग्रामीण भागात सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत जुलै २०२४ पर्यंत १२ कोटींपेक्षा जास्त शौचालय बांधण्यात आले होते. सहा लाख ३६ हजार कम्युनिटी टॉयलेट बांधण्यात आले. हरिद्वारमधील प्रेमनगर आश्रमचे व्यवस्थापक पवनकुमार यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आश्रमात १९९० मध्ये एकूण दहा हजार चौरस फुटात ४५० शौचालय असलेले जगातील सर्वांत मोठे दोन ‘टॉयलेट टॉवर’ बांधण्यात आले. दिल्लीच्या पंडवाला येथील श्री हंस नगर आश्रमात दहा वर्षांपूर्वी ४१६ शौचालयांचे ‘टॉयलेट टॉवर’ उभारण्यात आले. आध्यात्मिक गुरू सतपाल महाराज यांनी हे बांधले असल्याचेही त्यांनी सांगितले.
Web Summary : India boasts world's largest multi-story toilet towers in Haridwar and Delhi. Built by Satpal Maharaj, these towers promote sanitation. Under Swachh Bharat Mission, millions of toilets constructed, including community facilities.
Web Summary : भारत में हरिद्वार और दिल्ली में दुनिया के सबसे बड़े बहुमंजिला टॉयलेट टॉवर बने। सतपाल महाराज द्वारा निर्मित, ये टावर स्वच्छता को बढ़ावा देते हैं। स्वच्छ भारत मिशन के तहत लाखों शौचालय बनाए गए।