शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
4
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
5
तीन सरकारी बस एकमेकांवर घडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
6
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
7
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
8
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
9
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
10
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
11
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
12
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
13
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
14
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
15
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
16
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
17
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
18
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
19
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
20
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...

Indian Army: खतरनाक! सर्वाधिक उंचीवरचा रस्ता भारतात; BRO चा पराक्रम पाहून जग 'कोमात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 14:44 IST

World’s highest motorable road: अतिशय निमुळते पर्वत, डोंगररांगा पार करत बीआरओने 52 किमीचा हा पक्का रस्ता बनविला आहे. हा रस्ता लडाखच्या चुमार सेक्टरच्या महत्वाच्या छोट्या छोट्या शहरांना जोडतो. 

सीमा रस्ते संघटनेने (BRO) अथक प्रयत्न करून जगातील सर्वात उंचीवरचा रस्ता बांधला आहे. हा 52 किमीचा रस्ता बांधतानाच एवढा कठीण होता, की एवढ्या खडतर रस्त्यावरून वाहने चालविताना ड्रायव्हरचाही कस लागणार आहे. (World’s highest motorable road now in India; BRO completes Umlingla Pass construction)

Border Roads Organisation ही संघटना भारत सरकारची आहे. सीमाभागात रस्त्यांचे जाळे उभारण्याचे काम ही एजन्सी करते. बीआरओ ही भारतीय लष्कराची संघटना आहे. लडाख, काश्मीर सारख्या दुर्गम भागात लष्करी दळणवळणासोबत सामान्यांच्या वापरासाठी रस्ते बनविले जातात. जगातील सर्वात उंचीवरचा रस्ता बनविण्याचे रेकॉर्ड आता भारताच्या नावावर होणार आहे. पूर्व लड्डाखमध्ये उमलिंग ला पासवर 19300 फूट उंचीवर हा रस्ता बनविण्यात आला आहे. अतिशय निमुळते पर्वत, डोंगररांगा पार करत बीआरओने 52 किमीचा हा पक्का रस्ता बनविला आहे. हा रस्ता लडाखच्या चुमार सेक्टरच्या महत्वाच्या छोट्या छोट्या शहरांना जोडतो. 

याआधी जगात सर्वात उंचीवरचा रस्ता हा बोलिव्हियामध्ये होता. त्याची उंची 18,953 फूट होती. हा उटुरुंकु नावाच्या ज्वालामुखीपर्यंत जात होता.  माऊंट एव्हरेस्टचे जे बेस कॅम्प आहेत ते देखील या रस्त्याच्या उंचीपेक्षा कमी उंचीवर आहेत. तिबेटमध्ये 16,900 फूट, नेपाळचा दक्षिण बेस कॅम्प 17,598 फूट उंचीवर आहे. तर माऊट एव्हरेस्टचे शिखर हे 29,000 फूट उंचीचे आहे. 

चालकांसाठी का आव्हानात्मकउमलिंग ला पास हा प्रसिद्ध खारदुंग ला पास पेक्षा जास्त आव्हानात्मक आहे. संरक्षण मंत्रालयानुसार येथील तापमान हे थंडीत उणे 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरते. तसेच येथील ऑक्सिजन हा 50 टक्के कमी असतो. यामुळे येथे अधिक काळ राहणे कठीण असते.

टॅग्स :ladakhलडाखIndian Armyभारतीय जवान