गुमथळा येथे जागतिक मृदा दिवस
By Admin | Updated: December 13, 2015 00:07 IST2015-12-13T00:07:39+5:302015-12-13T00:07:39+5:30
गुमथळा : स्थानिक राजीव गांधी ग्राम पंचायत भवनात कृषी विकास केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने जागतिक मृदा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. एम. एस. कैरव होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य नरेश शेंडे, सरपंच वर्षा डाफ, कमल खेडकर, मंगला दिलीप मुळे, डॉ. संध्या क्रांती, डॉ. सुमन बालसिंह, डॉ. वेणुगोपाल, डॉ. सुभाष पाटील, आर. बी. सिंगनजुडे हे उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना शेतातील माती परीक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले; शिवाय विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी सतीश दीक्षित यांनी केले तर संचालन ज्ञानेश्वर जीभकाटे यांनी केले. आभार कृषी अधिकारी रिना डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमाला अश

गुमथळा येथे जागतिक मृदा दिवस
ग मथळा : स्थानिक राजीव गांधी ग्राम पंचायत भवनात कृषी विकास केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने जागतिक मृदा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. एम. एस. कैरव होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य नरेश शेंडे, सरपंच वर्षा डाफ, कमल खेडकर, मंगला दिलीप मुळे, डॉ. संध्या क्रांती, डॉ. सुमन बालसिंह, डॉ. वेणुगोपाल, डॉ. सुभाष पाटील, आर. बी. सिंगनजुडे हे उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना शेतातील माती परीक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले; शिवाय विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी सतीश दीक्षित यांनी केले तर संचालन ज्ञानेश्वर जीभकाटे यांनी केले. आभार कृषी अधिकारी रिना डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमाला अशोक मोहोड, दिनेश डाफ, रामभाऊ डाफ, नाना वाघ, रामभाऊ नाकतोडे, राजेंद्र कोंगे, सुरेश रामटेके, विश्वेश्वर पेठे, अशोक डाफ, अरुण खेडकर, कवडू खेडकर, सूर्यभान वानखेडे, सुनीता रामटेेके, मंदा कपाळे, सुरेश डाफ, रवींद्र डाफ, विठोबा डाफ, शंकर डाफ, धर्मा वानखेडे, श्रावण डाफ, ईश्वर डाफ, संतोष माळोदे, गुलाब डाफ यांच्यासह गुमथळा, भोवरी, सोनेगाव, आवंढी, उनगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वितेसाठी मंडळ कृषी अधिकारी सोनल गजभिये, कृषी सहायक ज्योती शिंदे, रूपा गजभिये, अशोक बावनकर, चैताली दशपुत्रे, रिता तिवारी, नलिनी रामटेके आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर)***