विश्वचषक दूरदर्शन

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:10+5:302015-02-18T00:13:10+5:30

विश्वचषकाचे प्रसारण

World Cup Television | विश्वचषक दूरदर्शन

विश्वचषक दूरदर्शन

श्वचषकाचे प्रसारण
दूरदर्शनवर कायम
नवी दिल्ली : भारतातील कोट्यवधी चाहत्यांना दूरदर्शनवर विश्वचषक क्रिकेट सामन्यांचा आनंद विनाअडथळा लुटता येणार आहे. सवार्ेच्च न्यायालयाने मंगळवारी स्वत:चा अंतरिम आदेश कायम ठेवला.
न्या. रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्वत:चा अंतरिम आदेश पुढे कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रसार भारतीला स्टार टीव्हीच्या प्रस्तावावर उत्तर पाठविण्याचे निर्देश दिले. स्टार टीव्हीने प्रसारभारतीला क्रिकेट सामन्यांच्या प्रसारणासाठी वेगळे चॅनेल बनविण्याची सूचना केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी गुरुवारी होईल. यापूर्वी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात न्यायालयाने सामन्याचे लाईव्ह फिड केबल ऑपरेटर्सना पुरविण्याच्या दूरदर्शनच्या निर्णयावर बंदी घालणारा आदेश स्थगित केला होता. याप्रकरणी बीसीसीआय आणि स्टार इंडियाला नोटीस बजावित हे प्रकरण सुनावणीयोग्य असल्याचे म्हटले होते. हायकोर्टाच्या आदेश स्थगित केल्यानंतर सुनावणीसाठी १७ फेब्रुवारी निश्चित करण्यात आली होती. केबल टीव्ही नेटवर्कच्या कलम आठअंतर्गत सर्वच टीव्ही ऑपरेटर्सना दूरदर्शनचे किमान दोन चॅनेल्स मोफत दाखविणे अनिवार्य आहे.
स्टार इंडियाच्यावतीने ज्येष्ठ वकील पी. चिदंबरम यांनी दावा केला की आमच्या अशीलाला २००७ पासून कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे. १४ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंडच्या संयुक्त यजमानपदाखाली सुरू झालेल्या ११ व्या विश्वचषकातील भारताचे सामने दूरदर्शनवर मोफत दाखविणे बंधनकारक आहे.(वृत्तसंस्था)
...................................................................................

Web Title: World Cup Television

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.