आंतरीत शक्ती ओळखण्यासाठी कार्यशाळा
By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:29+5:302015-01-31T00:34:29+5:30
(१०बाय२)

आंतरीत शक्ती ओळखण्यासाठी कार्यशाळा
(१ ०बाय२)आंतरीत शक्ती ओळखण्यासाठी कार्यशाळानागपूर : इश्वराने प्रत्येक मनुष्याला अनेक शक्ती तसेच क्षमता देऊन पृथ्वीवर पाठविले आहे. परंतु जीवनात सामान्य मानुस शारिरीक व मानसिक क्षमतेशिवाय इतर क्षमतेबाबत काहीच माहिती नसते. हे जाणुन घेण्यासाठी कुठल्याच शिक्षणाची तरतुद नाही. आपल्यातील शक्तीची ओळख झाल्यास आपणच आपल्या जीवनाला आकार देऊ शकतो. समृद्धी आणि सुख आपल्या पायाशी लोळन घेतात. अनेकजण तांत्रीक, पंडित, मौलवींचा आश्रय घेऊन आपली फसवणूक करतात. अशा व्यक्तींना मुक्ती देण्यासाठी रेकी हिलींग फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. एन. के. शर्मा, डॉ. सविता शर्मा मागील २५ वर्षांपासून भारत आणि जगभर रेकी अँड माईंड पॉवर कार्यशाळेच्या माध्यमातून कार्य करीत आहेत. नागपूर शहरातील सुप्रसिद्ध रेकी ग्रँड मास्टर आणि वास्तुतज्ज्ञ अल्का विरदी या शर्मा दाम्प्त्याच्या कार्यशाळांचे आयोजन करतात. अशीच दोन दिवसीय कार्यशाळा ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारीला सीताबर्डीच्या हॉटेल हरदेवमध्ये आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेत रेकी, टेलीपॅथी, अंतप्रेरणा, रोगमुक्ती, तणावापासून मुक्ती आदींचे ज्ञान देणार आहेत. ३ आणि ४ फेब्रुवारीला हॉटेल हरदेवमध्ये आयोजित कार्यशाळेत डोळ्यांवर पट्टी बांधुन आपल्या आंतरित क्षमतांचा विकास करण्याचे ज्ञान देण्यात येणार आहेत.