महिंद्रातर्फे कार्यशाळा

By Admin | Updated: August 31, 2015 21:30 IST2015-08-31T21:30:32+5:302015-08-31T21:30:32+5:30

सातपूर : येथील महिंद्र ॲण्ड महिंद्र कंपनीच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत एडब्ल्यूआयएम या नाशिक ऑलिम्पिक स्पर्धेच्या पूर्वतयारीची कार्यशाळा संपन्न झाली. या स्पर्धेत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Workshops by Mahindra | महिंद्रातर्फे कार्यशाळा

महिंद्रातर्फे कार्यशाळा

तपूर : येथील महिंद्र ॲण्ड महिंद्र कंपनीच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत एडब्ल्यूआयएम या नाशिक ऑलिम्पिक स्पर्धेच्या पूर्वतयारीची कार्यशाळा संपन्न झाली. या स्पर्धेत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सामाजिक जबाबदारी उपक्रमाअंतर्गत महिंद्र ॲण्ड महिंद्र कंपनीच्या वतीने इयत्ता ५वी व ६वीच्या विद्यार्थ्यांसाठी अ वर्ल्ड इन मोशन (एडब्ल्यूआयएम) या संकल्पनेतून नाशिक ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत हवेच्या दाबावर चालणारे जेट टॉय व स्किमर तयार करून त्यांच्या चाचण्या घेऊन प्रकल्पाचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण करायचे असते. या उपक्रमाची पूर्वतयारी म्हणून विभागीय पातळीवर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत नोंदणीकृत ४५ शाळांचे ९० शिक्षक व कंपनीतील २५ कर्मचारी सहभागी झाले. या कार्यशाळेतील विजयी संघास राष्ट्रीय स्पर्धेत सहभागाची संधी दिली जाते. राष्ट्रीय स्पर्धेत विजयी संघास परदेशातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागाची संधी मिळते. ही कार्यशाळा गुणवत्ता विभागाचे महाव्यवस्थापक दिलीप येवले यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश पाटील, अजय नामजोशी, विकास गर्ग, सुनील जानोरकर, रुपाली फुले, स्वप्नील पाटील, ऋषिकेश नाईक आदिंनी घेतली, अशी माहिती कमलाकर घोंगडे यांनी दिली. (वार्ताहर)

कॅप्शन :
महिंद्र ॲण्ड महिंद्र कंपनीच्या वतीने आयोजित अ वर्ल्ड इन मोशन या ऑलिम्पिक स्पर्धेच्या विभागीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांसह महाव्यवस्थापक दिलीप येवले, योगेश पाटील, अजय नामजोशी, विकास गर्ग, सुनील जानोरकर, रुपाली फुले, स्वप्नील पाटील, ऋषिकेश नाईक आदिंसह अधिकारी.

Web Title: Workshops by Mahindra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.