स्मार्ट शहरांच्या विकासासाठी कार्यदल
By Admin | Updated: January 27, 2015 23:50 IST2015-01-27T23:50:08+5:302015-01-27T23:50:08+5:30
अलाहाबाद, अजमेर आणि विशाखापट्टणम ही तीन स्मार्ट शहरे विकसित करण्यासाठी भारत आणि अमेरिकेचे संयुक्त कृतीदल स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला.

स्मार्ट शहरांच्या विकासासाठी कार्यदल
नवी दिल्ली : अलाहाबाद, अजमेर आणि विशाखापट्टणम ही तीन स्मार्ट शहरे विकसित करण्यासाठी भारत आणि अमेरिकेचे संयुक्त कृतीदल स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. हे कार्यदल तीन महिन्यांच्या आत आराखडा तयार करेल. शहर विकास मंत्री एम.वेंकय्या नायडू आणि अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री पेनी प्रीट्झकर याच्या बैठकीत उपरोक्त निर्णय झाला. दोन दिवसांपूर्वीच उभय देशांनी एका करारावर हस्ताक्षर केले असून याअंतर्गत अमेरिका व्यापार आणि विकास संस्थेच्या (यूएसटीडीए) सहकार्याने ही स्मार्ट शहरे विकसित केली जातील. कार्यदलात केंद्र व राज्य सरकार तसेच यूएसटीडीएचे अधिकारी असतील. देशभरात १०० स्मार्ट शहरे विकसित करण्याची योजना केंद्र सरकारने जाहीर केली आहे.