कामगार संघटनांचा २७ रोजी मोर्चा
By Admin | Updated: March 24, 2015 23:40 IST2015-03-24T23:07:07+5:302015-03-24T23:40:59+5:30
सिडको : कामगारांना पंधरा हजार रुपये किमान वेतन द्यावे, कंत्राटी कामगारांना कायम करावे यांसह विविध मागण्यांसाठी येत्या शुक्रवारी (दि.२७) महाराष्ट्रातील कामगारांचा मोर्चा सायन ते बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील कामगार आयुक्त कार्यालयावर काढण्यात येणार असल्याची माहिती भारतीय ट्रेड युनियनचे राज्य सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खुटवडनगर येथील सीटू भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र व राज्यातील भाजपाप्रणीत सरकार कामगार कायद्यात कामगार विरोधी बदल करीत आहे. सदरचे बदल हे कामगार हिताविरोधी असून यामुळे कामगारांचे जीवन असुरक्षित होणार असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. या विरोधात कामगारांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने कामगार कायद्यातील प्रास्ताविक बदल मागे घ्यावे, कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, कामगारांना दरमहा किमान १५ हजार वेतन मिळावे, कंत्राटी कामगारांना कायम करा, कामगार खात्यातील रिक्त पदे त्वरित भरा याबरोबरच अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे प्रश्न मार्गी लावावे यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात कामगारांनी सामील व्हावे, असे आवाहन डॉ. डी. एल. कराड, श्रीधर देशपांडे, सीताराम ठोंबरे, आर. एस. पांडे यांनी केले.