रस्ता उखडल्यावर सुरू झाले रेंगाळलेले काम सावंगी- चिकलठाणा : खड्डेमय रस्त्याच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:08+5:302015-02-14T23:50:08+5:30
औरंगाबाद : हर्सूल- सावंगी ते चिकलठाणा (केम्ब्रिज) या १३ कि. मी. रस्त्याचे जवळपास साडेपाच कि. मी. चे काम ठेकेदाराने थांबविल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रेंगाळले होते. त्यामुळे नव्याने निविदा काढल्यावर अखेर रेंगाळलेल्या कामाची सुरुवात झाली आहे. परंतु पूर्ण झालेल्या ७.५ कि. मी. रस्ता खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या रस्त्याचे नूतनीकरण करण्याची वेळ येत आहे.

रस्ता उखडल्यावर सुरू झाले रेंगाळलेले काम सावंगी- चिकलठाणा : खड्डेमय रस्त्याच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव
औ ंगाबाद : हर्सूल- सावंगी ते चिकलठाणा (केम्ब्रिज) या १३ कि. मी. रस्त्याचे जवळपास साडेपाच कि. मी. चे काम ठेकेदाराने थांबविल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रेंगाळले होते. त्यामुळे नव्याने निविदा काढल्यावर अखेर रेंगाळलेल्या कामाची सुरुवात झाली आहे. परंतु पूर्ण झालेल्या ७.५ कि. मी. रस्ता खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या रस्त्याचे नूतनीकरण करण्याची वेळ येत आहे.पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या औरंगाबाद शहराची लाईफ लाईन म्हणून जालना रोड ओळखला जातो. चिकलठाणा ते वाळूज महानगरकडे जाणार्या वाहनांची सकाळ, संध्याकाळ गर्दी असते. बीड, जालन्याहून अजिंठा, जळगावकडे ये-जा करणार्या वाहनांसाठी शहरातून जाण्यासाठी हा एकमेव रस्ता होता. परंतु १८ सप्टेंबर २००६ मध्ये सावंगी ते चिकलठाणा (केम्ब्रिज) रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले आणि रिंग रोड जोडण्याचा मार्ग मोकळा झाला; परंतु सुरुवातीला काही ठिकाणी भूसंपादन झालेले नसल्याने काम रखडले गेले. त्यानंतर ठेकेदाराने काम थांबविले. त्यामुळे जवळपास साडेपाच कि.मी.चे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रेंगाळले गेले होते. शिवाय झालेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून अवजड वाहनांशिवाय अन्य वाहनधारक प्रवास करण्याचे टाळत आहेत. त्यामुळे हा रस्ता तयार करण्याचा उद्देश पूर्णत्वास जात नसल्याचे गेल्या काही वर्षांपासून दिसून येत आहे.ठेके दाराने अर्धवट सोडलेले काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नव्याने निविदा मागविण्यात आली. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अखेर रेंगाळलेले हे काम पूर्ण झाले आहे. मे महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.खड्डेमय प्रवासाची वेळरखडलेले काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. परंतु त्यापूर्वी तयार झालेल्या रस्त्याची चाळणी झाल्यामुळे वाहनधारकांना खड्डेमय प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वापर करण्याचे धाडस टाळले जाईल. या संपूर्ण रस्त्याचे लवकरात लवकर काम करण्याची मागणी होत आहे.(जोड आहे)