सामाजिक बांधिलकीतून कामे करा :

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:16+5:302015-02-18T00:13:16+5:30

अविनाश धर्माधिकारी

Work on social commitment: | सामाजिक बांधिलकीतून कामे करा :

सामाजिक बांधिलकीतून कामे करा :

िनाश धर्माधिकारी
दौंड: 'स्व:ताचे दु:ख बाजूला ठेवून इतरांच्या वाटेला दु:ख येऊ नये म्हणून सामाजिक बांधिलकीतून काम करणार्‍या रोहिणी जाधव स्मारक ट्रस्टचे काम गौरवास्पद आहे,' असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
रोहिणी जाधव स्मारक ट्रस्टच्या वतीने दौंड येथील राज्यस्तरीय गुणवंत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
धर्माधिकारी म्हणाले, की येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जाधव यांच्या पुढाकाराने गेल्या १९ वर्षांपासून विविध क्षेत्रांत काम करणार्‍या गुणवंतांचा गौरव करून त्यांच्या पाठीवर थाप देण्याचे काम सुरू असून, ही बाब समाजाला भूषणावह आहे.
माजी आमदार रंजना कुल यांनी रोहिणी जाधव ट्रस्टच्या कामाचा गौरव करून भविष्यात या संस्थेला मदत करण्याचा संकल्प केला. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र जाधव यांनी गेल्या १९ वर्षांच्या संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाची सुरुवात झाडांच्या रोपांना मान्यवरांच्या हस्ते पाणी घालून करण्यात आले. तसेच पुणे येथील सायली गुजर यांच्या रेड लाईट विभागातील लहान मुलांचा नृत्याविष्कार सादर करण्यात आला. तर, शेठ ज्योतिप्रसाद विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेच्या पथकाने सलग ७ वर्ष पर्यावरण जागृती व संवर्धनाचा शासनाचा पुरस्कार मिळवल्याबद्दल या संस्थेचा गौरव अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी प्रभारी नगराध्यक्ष योगेश कटारिया, डॉ. प्रेमकुमार भ˜ड, ॲड. अशोक मुनोत, डॉ. राजेंद्र माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विकास देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, विविध क्षेत्रांतील गौरवमूर्तींची नावे पुढील प्रमाणे : सामाजिक पुरस्कार :- प्रकाश देशपांडे (पुणे), सायली गुजर (पुणे), महेश निंबाळकर (इंदापूर), प्रमोद खांगल (दौंड), प्रल्हाद जाधव (दौंड), रक्तदाता पुरस्कार :- अविनाश पुरंदरे, अतुल पुरंदरे (बारामती), रिटा शेटिया (पुणे), रक्तमित्र पुरस्कार :- अविनाश वैद्य (चिंचवड), एड्स जनजागृती पुरस्कार :- सीमा वाघमोडे (पुणे), डॉ. निरज जाधव (पुणे), निसर्ग पर्यावरण मित्र पुरस्कार :- श्रीमती संध्या चौगुले (सातारा)

फोटो ओळ:- दौंड येथील रोहिणी जाधव स्मारक ट्रस्टच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणार्‍या राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यात माजी सनदीअधिकारी अविनाश धर्माधिकारी व गौरवमूर्ती.

17022015-िं४ल्लि-10

-----------------

Web Title: Work on social commitment:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.