नवी दिल्ली - अलीकडेच भारतातील वर्क कल्चरबाबत समोर आलेल्या रिपोर्टनं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार परिषद आणि २०१९ च्या टाइम यूज सर्वेच्या आधारे या रिपोर्टमध्ये काही धक्कादायक खुलासे केले आहेत. देशात गुजरात राज्यातील लोक भारतात सर्वात जास्त तास काम करतात असं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. याठिकाणचे लोक कठीण परिश्रम आणि कामाप्रती समर्पण यासाठी ओळखले जातात. गुजरात देशातील औद्योगिक आणि व्यापारी नकाशावर वेगाने पुढे येत आहे तर दुसरीकडे बिहारमधील लोक सर्वात कमी तास काम करतात असं रिपोर्टमध्ये आलं आहे.
गोव्यात स्मार्ट वर्क स्ट्रॅटर्जी
या रिपोर्टनुसार, गोव्यात लोक कमी तास काम करत असले तरी आर्थिकदृष्ट्या प्रगतशील आहेत. गोव्याने स्मार्ट वर्क मंत्र अवलंबला आहे. इथं लोक कमी वेळात जास्त काम करतात आणि आपल्या आयुष्याचा आनंदही घेतात. गोव्याचं हे यश पाहता केवळ जास्त काम करणेचे पुरेसे नाही तर स्मार्टपद्धतीने काम करण्याची गरज असल्याचं दाखवून देतात.
त्याशिवाय शहरात राहणाऱ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागातील लोक जास्त काम करतात. शहरातील जलद गतीने धावणारी स्पर्धात्मक लाईफस्टाईल हे त्यामागचं कारण असू शकते असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. पुरूष महिलांच्या तुलनेत अधिक काम करतात, जी समाजातील नेहमीची परंपरा आहे
सरकारी नोकरी - आराम की आव्हान?
रिपोर्टनुसार, सरकारी कर्मचारी खासगी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी काम करतात परंतु त्याचा अर्थ सरकारी नोकरी आरामदायी आहे असं नाही. प्रत्येक नोकरीत आव्हाने आहेत.
जास्त काम, कमी कमाई?
जास्त काम केल्याने जादा कमाई होते असं नाही. गोवा यामागचे सर्वात मोठे उदाहरण आहे. या रिपोर्टमुळे आपण योग्य प्रकारे काम करतोय की नाही, आपण केवळ जास्त काम करण्यावर की स्मार्ट वर्कवरही लक्ष देतोय हे देखील उघड झालं.
दरम्यान, भारत, चीन, मलेशिया आणि फिलिपिंस एकसारखेच काम करतात परंतु आपली प्रतिव्यक्ती जीडीपी कमी आहे. उत्पादनवाढीवर आपल्याला भर देण्याची आवश्यकता असल्याचं रिपोर्टमधून दिसते. स्मार्क वर्क, इनोवेशन आणि टेक्नोलॉजीचा वापर करायला हवा जेणेकरून कमी काळात जास्त काम होऊ शकते आणि त्यातून देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल.
राज्यांची अवस्था काय?
रिपोर्टनुसार, गुजरातचे ७.२ टक्के कर्मचारी आठवड्याला ७० हून अधिक तास काम करतात. पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल यांचाही जास्त काम करणाऱ्या राज्यांत समावेश आहे. दुसरीकडे बिहारमध्ये सर्वात कमी लोक तासांवर काम करतात. बिहारमधील अशा लोकांची संख्या गुजरातच्या तुलनेत सात पटीने कमी आहे. दिल्लीत रोज ८.३० तास काम करणारे लोक आहेत. गोव्यात लोक ५.५ तास काम करतात. पूर्वात्तर राज्यातही दिवसाला ६ तास काम केले जाते.