विधानभवनात कर्मचार्याची आत्महत्या तीन महिने वेतन न मिळाल्याच्या तणावातून केले कृत्य
By Admin | Updated: June 25, 2015 23:51 IST2015-06-25T23:51:14+5:302015-06-25T23:51:14+5:30
विधानभवनात कर्मचार्याची आत्महत्या

विधानभवनात कर्मचार्याची आत्महत्या तीन महिने वेतन न मिळाल्याच्या तणावातून केले कृत्य
व धानभवनात कर्मचार्याची आत्महत्यातीन महिने वेतन न मिळाल्याच्या तणावातून केले कृत्यमुंबई । दि. २५ (प्रतिनिधी) ............................................अर्जुन श्रीहरी कचरे(४२) या कर्मचार्याने तीन महिन्यांचे वेतन न मिळाल्याने आलेल्या तणावातून विधानभवनात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी सकाळी आठच्या सुमारास समोर आली. मुंब्रयाला राहाणारे कचरे विधानभवनातील अग्निशमन दलाचे कर्मचारी होते. त्यांचा मृतदेह विधानभवनाच्या घुमटावर आढळल्याची माहिती मरिनड्राईव्ह पोलिसांकडून मिळते.प्राथमिक तपासात कचरे यांनी मंत्रालयाच्या नव्या इमारतीवरून उडी मारली. ते विधानभवनाच्या घुमटावर आदळून गंभीररित्या जखमी झाले, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद घेत चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर कचरे यांना जखमी अवस्थेत जीटीरूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.कचरे सकाळी ७ वाजता कर्तव्यावर हजर झाले. मात्र त्यानंतर त्यांच्या मृत्यूचीच माहिती सहकार्यांना समजली. कचरे यांनी नेमकी कुठून उडी मारली याची माहिती कोणालाही नाही, असे पोलीस सांगतात. तीन महिन्यांचे वेतन न मिळाल्याने कचरे तणावात होते, ही माहिती सहकार्यांच्या जबाबातून समोर आली आहे. वेतन का मिळाले नव्हते याची चौकशी पोलीस करणार आहेत. त्यांचा मोबाईल फोनही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे. त्यांनी अखेरचा कॉल कोणाला केला, वरिष्ठांना एसएमएस धाडला होता का, हेही पोलीस तपासणार आहेत.