शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भावासाठी कायपण! भावाचा जीव वाचवण्यासाठी त्याने घेतला वाघाशी पंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 17:22 IST

भावंडांमध्ये प्रेम आणि आपलेपणाची वीण भक्कम असली की ती एकमेकांसाठी काहीही करण्यास तयार होतात. अशाच एका भावाने वाघाच्या जबड्यात सापडलेल्या आपल्या भावाला वाचवण्यासाठी चक्क त्या वाघाशीच पंगा घेतला.

कोलकाता - भावंडांमध्ये प्रेम आणि आपलेपणाची वीण भक्कम असली की ती एकमेकांसाठी काहीही करण्यास तयार होतात. अशाच एका भावाने वाघाच्या जबड्यात सापडलेल्या आपल्या भावाला वाचवण्यासाठी चक्क त्या वाघाशीच पंगा घेतला. या भावाने वाघाच्या पश्चिम बंगालमधील सुंदरबन परिसरातील एका गावात ही घटना घडली आहे. सुंदरबनमधील गोसाबा येथील एका गावात दिवाकर आणि देवव्रत सरकार हे भाऊ राहतात. सुंदरबनातील दाट जंगलांमध्ये खेकडे पकडून आपली उपजिविका करतात. रविवारी हे दोघे भाऊ अन्य एक मच्छिमार सहकारी गौर मौडलसोबत खोलखली नदीजवळ खेकडे पकडण्यासाठी गेले होते. दिवाकर हा बाहेर थांबला. तर  देवव्रत आणि गौर खेकडे पकडू लागले.त्याचदरम्यान तेथे शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी त्यांनी नदीत उडी घेतली. मग वाघानेही त्यांच्यापाठोपाठ नदीत उडी घेतली. यादरम्यान, गौर याने स्वत:ला वाचवले, पण देवव्रत वाघाच्या तावडीत सापडला. वाघाने त्याचा गळा आणि हात पकडला. आपला भाऊ वाघाच्या जबड्यात सापडला हे पाहून दिवाकरने स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता नदीत उडी घेतली. त्याने एक छडी आणि होडीमधील लाकडाचा वल्हा घेऊन वाघाला मारण्यास सुरुवात केली. दिवाकरने केलेल्या प्रहारांमुळे जखमी झालेल्या वाघाने देवव्रतला सोडून जंगलात पलायन केले. त्यानंतर दिवाकरने आपल्या भावाला रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचारानंतर देवव्रतच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.   

टॅग्स :TigerवाघIndiaभारत