शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

कर्नाटकातील नव्या आघाडीमुळे २०१९च्या लोकसभेचे काम सोप्पे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 5:18 AM

कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांची आघाडी २०१९च्या लोकसभेसाठीही कायम राहिल्यास भाजपाला मोठा फटका बसणार आहे.

हरिष गुप्तानवी दिल्ली/बंगळुरू : कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांची आघाडी २०१९च्या लोकसभेसाठीही कायम राहिल्यास भाजपाला मोठा फटका बसणार आहे. इतर चार राज्यांमध्येही भाजपाच्या विरोधात असलेल्या पक्षांनी काँग्रेससोबत एकमूठ केल्याने मोदींच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे.२0१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठीही र्नाटकात काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) या दोघांनी आघाडी करण्याची गरज आहे. त्यासाठी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याशी काँग्रेस नेते चर्चा करणार असल्याचे समजते. जनता दलही त्यास तयार होईल, असा अंदाज आहे. तशी आघाडी झाली, तर लोकसभेच्या २८ जागांपैकी केवळ ६ जागाच भाजपाला मिळू शकतील आणि उरलेल्या २२ जागा आघाडीला मिळू शकतील, असे आताच्या मतदानाच्या आकड्यांतून दिसत आहे. भाजपाला २0१४ च्या निवडणुकांत २८ पैकी १७ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला १0 मिळाल्या होत्या, तर जनता दलाचे एच. डी. देवेगौडा एकटेच विजयी झाले होते. त्यामुळे या पक्षांनी एकत्र येणे कसे आवश्यक आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. त्यासाठी जागांबाबत एकमत होणे गरजेचे आहे. आघाडीमुळे दोन्ही पक्षांच्या जागा वाढण्याची शक्यता असल्याने ते तयार होतील, असे बोलले जाते.>पाच राज्यांमध्ये मोदींना बसू शकतो १०० जागांचा फटकामोदींना कोणत्याही सत्तेत राहू द्यायचे नाही, या उद्देशाने आता मोठे विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. काँग्रेसने आतापर्यंत मोदींना विरोध करणाऱ्या पक्षांसोबत चार राज्यांमध्ये आघाडी केली असून, यात आता कर्नाटकचीही भर पडली आहे. या आधी बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि झारखंड या चार राज्यांमध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेसने आता जेडीएससोबत आघाडी करून मोदीविरोध आणखी तीव्र केला आहे. येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये हे पाचही राज्य मोदी आणि भाजपासाठी अडचण निर्माण करणारे ठरू शकतात. या पाच राज्यांमध्ये लोकसभेच्या २१० जागा आहेत. त्यापैकी २०१४मध्ये भाजपा आणि मित्रपक्षांनी मिळून १७४ जागांवर विजय मिळवला होता.काँग्रेस केवळ १५ जागांवर विजयी झाली होती. विरोधी पक्ष त्यावेळी एकत्र नव्हते. आता पाचही राज्यांमध्ये विरोधकांची एकजूट झाल्याने २०१९ची लोकसभा निवडणुकीत हे चित्र पालटण्याची आशा निर्माण झाली आहे. २१०पैकी भाजपाला १०० जागाही मिळणार नाहीत, असे राजकीय पंडितांचे म्हणणे आहे.>97%आमदार करोडपतीकर्नाटकमध्ये निवडून आलेल्या एकूण २२१ आमदारांपैकी २१५ (९७ टक्के) करोडपती आहेत. एडीआरने हा अहवाल आमदारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे तयार केला आहे.भाजपाच्या १०३ पैकी १, काँग्रेसच्या ७८ पैकी ११ आणि जेडीएसच्या ३७ पैकी ३ आमदारांकडे १०० कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे. राज्यात सर्वाधिक श्रीमंत आमदारांमध्ये पहिले तीनही काँग्रेसचे आहेत.काँग्रेस आमदार एम. नागराजू यांच्याकडे १०१५ कोटी, डी.के. शिवकुमार यांच्याकडे ८४० कोटी आणि सुरेश बी. एस. ४१६ कोटी इतकी संपत्ती असल्याचे निदर्शनास आले आहे.2013मध्ये कर्नाटकमधील २१८ आमदारांकडे सरासरी २३.५४ कोटी इतकी मालमत्ता होती तर २०१८ मध्ये एकूण २२१ आमदारांकडे सरासरी ३४.५४ कोटी इतकी संपत्ती आहे, असे दिसून आले आहे.>मायावतींचा पुढाकारभाजपाला बहुमत मिळालेले नाही, हे लक्षात येताच, बसपाच्या नेत्या मायावती यांनी एच. डी. देवेगौडा यांच्याशी संपर्क साधून काँग्रेसशी आघाडी करून सरकार बनवा, सोनिया गांधी यांच्याशी ताबडतोब चर्चा करा, असा सल्लाही दिला. आपल्या पक्षाचे कर्नाटकातील नेते अशोक सिद्धार्थ यांना गुलाम नबी आझाद यांची भेट घ्यायला सांगितली. त्या दोघांच्या चर्चेची माहिती आझाद यांनी गांधी यांना दिली. तोपर्यंत देवेगौडा व सोनिया गांधी यांचीही बोलणी झाली होती. त्यामुळे काँग्रेसने कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदासाठी आम्ही पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.>काँग्रेसविरोध मावळला?मायावती यांनी कर्नाटकात जेडीएसला पाठिंबा दिला होता. त्यांचा एक उमेदवारही विजयी झाला. मायावती यांचा काँग्रेसविरोध मावळत चालल्याची चर्चा सुरू आहे.>आघाडीमुळे काँग्रेस-जनता दलास मिळाल्या असत्या १५६ जागाकाँग्रेसने कर्नाटकात निवडणुकांनंतर जनता दल (धर्मनिरपेक्ष) चे नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदासाठी निवडणुकीनंतर पाठिंबा दिला असला तरी या दोन पक्षांची निवडणुकांआधी आघाडी झाली असती, तर एकूण १५६ जागांवर विजय मिळाला असता.भाजपाला जेमतेम ६८ जागा मिळाल्या असत्या, असे मतांचे आकडे व टक्केवारीवरून दिसत आहे. राज्यात आघाडीचे सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते यशस्वी होणार का, हे सांगणे अवघड आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८