शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

महिला पायलटच्या लैंगिक छळाची उच्च पातळीवर चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 06:22 IST

एअर इंडियाच्या एका महिला पायलटने तिच्या कमांडरविरुद्ध केलेल्या लैंगिक छळाच्या तक्रारीची उच्च पातळीवर चौकशी होणार आहे.

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या एका महिला पायलटने तिच्या कमांडरविरुद्ध केलेल्या लैंगिक छळाच्या तक्रारीची उच्च पातळीवर चौकशी होणार आहे. एअर इंडियाने बुधवारी ही माहिती दिली. महिला पायलटने दिलेल्या तक्रारीनुसार कथित लैंगिक छळाचा प्रकार ५ मे रोजी हैदराबादेत कमांडरकडून तिला प्रशिक्षण दिले जात असताना घडला. छळाचा विषय जसा आमच्या निदर्शनास आल्यावर लगेचच आम्ही त्याच्या चौकशीसाठी उच्च पातळीवरील चौकशी समिती स्थापन केली, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने म्हटले.पायलटने तक्रारीत आरोप केला की, कमांडरने ५ मे रोजी प्रशिक्षण सत्र संपल्यानंतर आपण दोघांनी हैदराबादेत रेस्टॉरंटमध्ये एकत्र जेवण केले पाहिजे, असे सुचवले. आम्ही रात्री सुमारे ८ वाजता रेस्टॉरंटमध्ये गेलो. कमांडरने तो त्याच्या वैवाहिक आयुष्यात कसा निराश आणि असमाधानी आहे हे सांगायला सुरुवात केली. त्याने मला काही असभ्य आणि अश्लील गोष्टी विचारल्या, असे सांगून तिने तक्रारीत म्हटले आहे की, एका वेळी तर मी त्याला या कोणत्याच गोष्टीवर मला तुमच्याशी बोलायचे नाही, असे सांगून कॅब बोलावली.

खूपच धक्का बसला, फार अस्वस्थ वाटत होतेकॅब येईपर्यंतच्या अर्ध्या तासात कमांडरचे वर्तन अतिशय वाईट होते. त्याच्या वर्तनाचा मला खूपच धक्का बसला आणि मला फार अस्वस्थ वाटत होते, मी भ्यालेली आणि अपमानित झालेली होते, असे तिने म्हटले. हे सगळे प्रकरण एअर इंडियाला कळविले पाहिजे म्हणजे पुन्हा असे काही भविष्यात इतरांबाबत घडणार नाही, असे मला नैतिकदृष्ट्या वाटले, असेही तक्रारीत तिने म्हटले.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया