शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"राजकीय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढेल", लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर PM मोदींची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 02:21 IST

आता लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव असतील. 

संसदेच्या विशेष अधिवेशनात तिसऱ्या दिवशी बुधवारी,  लोकसभेत प्रदीर्घ चर्चेनंतर, 'महिला आरक्षण विधेयका'ला मंजुरी मिळाली. महिला आरक्षण विधेयकाच्या अर्थात नारी शक्ती वंदना विधेयकाच्या बाजूने 454 मते पडली. तर विरोधात 2 मते पडली. हे विधेयक लोकसभेत दोन तृतीयांश बहुमताने मंजूर झाले. यासाठी लोकसभेत चिठ्ठ्यांच्या माध्यमाने मतदान झाले. आता लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव असतील. 

हे आरक्षण लागू झाल्यानंतर लोकसभेतील महिला खासदारांची संख्या 181 होईल. सध्या हे महिला आरक्षण 15 वर्षांसाठी लागू असेल. मात्र हे संसदेच्या मंजुरीनंतर वाढवले ​​जाऊ शकते. लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सवर पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी? - एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान मोदी म्हणाले, "लोकसभेत संविधान (128 वे सुधारणा) विधेयक, 2023 एवढ्या अभूतपूर्व समर्थनासह मंजूर झाल्याने आनंद वाटला. या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान करणाऱ्या सर्व पक्षांच्या खासदारांचे मी आभार मानतो. नारी शक्ती वंदना अधिनियम हा एक ऐतिहासिक कायदा आहे. जो महिला सक्षमीकरणाला अधिक चालना देईल आणि आपल्या राजकीय प्रक्रियेत महिलांचा सहभाग अधिक वाढेल."

तत्पूर्वी, हे बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित महिला आरक्षण विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आले होते. कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांनी लोकसभेत या विधेयकातील तरतुदींची माहिती दिली. यानंतर, काँग्रेस खासदार सोनिया गांधींसह, स्मृती इराणी, सुप्रिया सुळे, राहुल गांधी, अमित शाह आदी नेत्यांनी या विधेयकावर चर्चा केली. जवळपास सर्वांनीच या विधेयकाला समर्थन दिले. मात्र लोकसभेत मंजूर झाल्यानंतर, आता राज्यसभेत या विधेयकाची परिक्षा होणार आहे. पण, राज्यसभेत मोदी सरकारला बहुमत नसले तरी या विधेयकाला मिळालेल्या समर्थनावरुन हे विधेयक तेथेही सहज मंजूर होईल, असे दिसते.

 

टॅग्स :Women Reservationमहिला आरक्षणNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदlok sabhaलोकसभा