Women's Day Special : व्होडाफोन देणार 2 जीबीचा फ्री डेटा
By Admin | Updated: March 8, 2017 11:44 IST2017-03-08T05:44:52+5:302017-03-08T11:44:15+5:30
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर व्होडाफोननं दिल्ली आणि एनसीआरमधल्या महिला युजर्ससाठी नवी ऑफर सुरू केली आहे.

Women's Day Special : व्होडाफोन देणार 2 जीबीचा फ्री डेटा
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर व्होडाफोननं दिल्ली आणि एनसीआरमधल्या महिला युजर्ससाठी नवी ऑफर सुरू केली आहे. कंपनीच्या सर्व व्होडाफोन रेड पोस्टपेड प्लॅनवर महिला युजर्सला 2 जीबीपर्यंत मोफत डेटा मिळणार आहे. मात्र ही ऑफर फक्त एका दिवसापुरती मर्यादित असणार आहे. 2 जीबीचा हा डेटा सब्सक्राइब प्लॅनशी जोडलेला असणार आहे. युजर्सला याची माहिती एसएमएसद्वारे प्राप्त होणार आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये राहत असल्यास व्होडाफोन रेड पोस्टपेड प्लॅन महिला युजर्सला हा फ्री डेटा मिळणार आहे. तुम्हाला या फ्री डेटाची माहिती मॅसेजच्या माध्यमातून मिळणार आहे. जर तुम्हाला याची माहिती एसएमएसद्वारे प्राप्त न झाल्यास तुम्ही जवळच्या व्होडाफोन स्टोअरमध्येही जाऊ शकता. तसेच त्यांच्याशी बातचीत करू शकता.
व्होडाफोन इंडियाचे बिझनेस हेड आलोक वर्मा म्हणाले, एक संघटनात्मक पद्धतीनं महिलांना समान संधी देण्यावर आमचा विश्वास आहे. तसेच याची झलक आमच्या काम करण्याच्या पद्धतीतून तुम्हाला पाहायला मिळेल. आमच्यासाठी पुरुष युजर्ससारख्या महिला युजर्सही गरजेच्या आहेत. महिलांचं हे पाऊल महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी आहे. तसेच त्यांच्या जीवनात त्यांना चांगल्या संधी मिळाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गेल्या काही दिवसांपूर्वीच जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोननं नवा टेरिफ प्लॅन बाजारात आणला आहे. त्या प्लॅननुसार युजर्सला 346 रुपयांत महिन्याभरासाठी 4जीच्या स्पीडसह 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. याची वैधता 28 दिवसांसाठी असणार आहे. जिओच्या एक पाऊल पुढे जात व्होडाफोन कंपनीनं सर्व युजर्ससाठी ही ऑफर आणली आहे. जिओसारखं हे प्राइम सेगमेंट मेंबर्ससाठी उपलब्ध असणार नाही.