शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

महिला आयोगाला पोटगीचे आदेश देण्याचे अधिकार नाहीत- केरळ हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 15:35 IST

पोटगीबद्दल आदेश देण्याचे अधिकार केरळ महिला आयोगाला नाहीत असे उच्च न्यायालयाने श्रीकुमार व्ही विरुद्ध केरळ महिला आयोग या खटल्याच्या निकालात स्पष्ट केले.

नवी दिल्ली- घटस्फोटित पत्नी आणि मुलांच्या खर्चासाठी पगारातील तीन-चतुर्थांश वाटा देण्याचे आदेश देणारा केरळ महिला आयोगाचा आदेश केरळ उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला आहे. पोटगीबद्दल असे आदेश देण्याचे अधिकार केरळ महिला आयोगाला नाहीत असे उच्च न्यायालयाने श्रीकुमार व्ही विरुद्ध केरळ महिला आयोग या खटल्याच्या निकालात स्पष्ट केले.

केरळ महिला आयोगाने श्रीकुमार यांनी त्यांच्या पत्नीला व दोन मुलांना खर्चापोटी पगारातील तीन चतुर्थांश रक्कम द्यावी असे आदेश दिले होते. मुलांचे शिक्षण, दैनंदिन गरजा आणि गृहकर्जाचे हप्ते या सर्वांचा विचार यामध्ये करण्यात आला होता. या आदेशांविरोधात श्रीकुमार यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. भूपिंदर सिंग विरुद्ध दिल्ली महिला आयोग या खटल्याचा आधार घेत केरळ महिला आयोगाकडे पोटगीबद्दल आदेश देण्याचे कोणतेही अधिकार नाहीत अशी बाजू श्रीकुमार यांनी मांडली. त्यानुसार न्यायाधीश अनु शिवरामन यांनी केरळ महिला आयोग कायद्याच्या 16 व्या कलमानुसार आयोगाला असे कोणतेही अधिकार देण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले.पत्नी आणि मुलांना देण्यात येणाऱ्या पोटगीसंदर्भातील तरतूद पर्सनल लॉ आणि फॅमिलि कोर्ट्स अॅक्ट अन्वये करता येते. केरळ महिला आयोग 1990 या कायद्याचा विचार केल्यास संबंधित व्यक्तीला पोटगीचे आदेश देण्याचे अधिकार महिला आयोगाला नाहीत असे उच्च न्यायालयाने आपल्या निवाड्यात स्पष्टपणे नमूद केले. 

टॅग्स :KeralaकेरळWomenमहिलाDivorceघटस्फोट