सीबीएसई 12वीच्या पुस्तकात सांगितली महिलांची "बेस्ट फिगर"
By Admin | Updated: April 13, 2017 21:31 IST2017-04-13T21:31:25+5:302017-04-13T21:31:25+5:30
सीबीएसई 12वीच्या पुस्तकात महिलांच्या बेस्ट फिगरसंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

सीबीएसई 12वीच्या पुस्तकात सांगितली महिलांची "बेस्ट फिगर"
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - सीबीएसई 12वीच्या पुस्तकात महिलांच्या बेस्ट फिगरसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. पुस्तकात ज्या मुलींची फिगर 36-24-36 अशी असते, त्यांची फिगर बेस्ट असल्याचं म्हटलं आहे. पुस्तकात पुरुष आणि महिलांच्या फिटनेससंदर्भातही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. यानंतर सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत.
पुस्तकात असाही प्रश्न विचारण्यात आला की, कोणत्या फिगरची महिला सर्वात बेस्ट असते आणि या प्रश्नाच्या उत्तरादाखल महिलांच्या वेगवेगळ्या फिगरची माहिती देण्यात आली आहे. त्यात ज्या महिलांची फिगर 36-24-36 अशी असते त्या महिला बेस्ट असल्याचंही याच पुस्तकात म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर याच्या उदाहरणादाखल मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्ससारख्या कार्यक्रमात भाग घेणा-या मॉडल्सही उदाहरण देण्यात आलं आहे. तसेच अशी फिगर हवी असल्यास महिलांनी व्यायाम करण्याची गरज असल्याचंही मत मांडण्यात आलं आहे. बुधवारी हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र सीबीएसईनं या प्रकरणातून स्वतःचं अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक आमचं नाही, तर एका खासगी प्रकाशकाचं आहे. तसेच आम्ही आमच्या शाळांमध्ये खासगी प्रकाशकाचं पुस्तकाद्वारे शिकवण्यास सांगत नाही.
मात्र सीबीएसईच्या अनेक शाळांमध्ये या वादग्रस्त पुस्तकाच्या माध्यमातून शिकवलं जातं. न्यू सरस्वती प्रकाशनाच्या या पुस्तकाचं नाव "हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन" आहे. या पुस्तकाचे लेखक डॉ. व्ही. के. शर्मा आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पुस्तकात या गोष्टी समजावण्यासाठी मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स सारख्या कार्यक्रमात भाग घेणा-या मॉडल्सचं उदाहरण देण्यात आलं आहे. तसेच ज्या लोकांना अशी फिगर हवी आहे, त्यांनी व्यायाम करण्याची गरज असल्याचं मतही मांडण्यात आलं आहे. यापूर्वीही सीबीएसई 12वीच्या बायोलॉजीच्या प्रश्नावर वाद निर्माण झाला होता