सशस्त्र दलात महिलांची भरती होणार

By Admin | Updated: August 7, 2014 02:19 IST2014-08-07T02:19:35+5:302014-08-07T02:19:35+5:30

केंद्रीय पोलीस दलातील महिला कर्मचा:यांचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी सरकारने कॉम्बॅट रँकच्या पाच दलात सुमारे दहा हजार महिलांची भरती करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिली आहे.

Women will be recruited in the Armed Forces | सशस्त्र दलात महिलांची भरती होणार

सशस्त्र दलात महिलांची भरती होणार

>नवी दिल्ली : केंद्रीय पोलीस दलातील महिला कर्मचा:यांचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी सरकारने कॉम्बॅट रँकच्या पाच दलात सुमारे दहा हजार महिलांची भरती करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिली आहे. 
‘फिल्ड डय़ुटी’साठी महिलांची भरती करण्याबद्दलच्या नवीन योजनेवर विचार करण्यात येत असून, ते टप्प्याटप्प्याने केले जाईल. या कामासाठी सर्व दलांना निधी मंजूर करण्यात आला आहे, असे सूत्रंनी सांगितले. 
केंद्रीय गृहमंत्रलयाने मान्यता दिलेल्या या नवीन योजनेंर्तगत देशातील सर्वात मोठे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, सीआरपीएफला येत्या तीन वर्षात तीन हजार महिलांचे तीन नवीन बटालियन स्थापन करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. याशिवाय सीआरपीएफच्या शीघ्र कृती दलासाठी 8क्6 महिलांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. 
देशाच्या सीमा सुरक्षेची जबाबदारी असलेल्या बीएसएफला दोन वर्षात तीन हजार महिलांची भरती करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. नेपाळ आणि भूतान बाजूने भारताच्या सीमेचे रक्षण करणा:या सशस्त्र सीमा दल (एसएसबी) यास 2क्18 र्पयत 2,772 महिलांची भरती करण्यास सांगण्यात आले आहे. भारत-चीन सीमेचे रक्षण करणा:या इंडो-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) महिलांच्या 35 पलटण स्थापन करणार आहे. एका पलटणमध्ये 3क् कर्मचारी असतात. त्यानुसार सुमारे 1,क्5क् महिला कर्मचा:यांची भरती केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना पुढील दोन वर्षात डोंगर प्रशिक्षित दलात समाविष्ट करण्यात येईल. अशाचप्रकारे इंडो-म्यानमार सीमेचे रक्षण करणारे आसाम रायफल्स या निमलष्कर दलात एक हजार महिलांची भरती केली जाणार आहे. (वृत्तसंस्था)
 
4 दिल्ली पोलीस दलात महिला कर्मचा:यांची संख्या एक तृतीयांश एवढी वाढविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. 
 
4 दिल्ली पोलिसांत महिला कर्मचा:यांची एक तृतीयांश संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य पोलीस आणि केंद्रीय पोलीस दलात देखील महिलांची संख्या एक तृतीयांश करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे ते शून्यप्रहरामध्ये म्हणाले. 

Web Title: Women will be recruited in the Armed Forces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.