भारतात पळून आलेल्या महिलेस अखेर अटक

By Admin | Updated: August 30, 2014 02:34 IST2014-08-30T02:34:51+5:302014-08-30T02:34:51+5:30

स्पेनच्या न्यायालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पासपोर्ट जप्त केल्यानंतर विमानतळावरच्या कडक तपासणीला चकवा देऊन मुलीच्या पासपोर्टवरून स्पेनमधून भारतात पळून आलेल्या महिलेला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली

The women who fled India are finally arrested | भारतात पळून आलेल्या महिलेस अखेर अटक

भारतात पळून आलेल्या महिलेस अखेर अटक

दीपक जाधव/संजय कैकाडे, पुणे
स्पेनच्या न्यायालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पासपोर्ट जप्त केल्यानंतर विमानतळावरच्या कडक तपासणीला चकवा देऊन मुलीच्या पासपोर्टवरून स्पेनमधून भारतात पळून आलेल्या महिलेला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. भारतीय पासपोर्ट व पोलीस यंत्रणेतील
त्रुटी हेरून तिने त्याचा फायदा करून घेत तिचा बचाव केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.
आंतरराष्ट्रीय यंत्रणांना चकवा देऊन ती गेल्या ५ वर्षांपासून पुण्यात राहत असल्याचे धक्कादायक प्रकरण ‘लोकमत’ने उजेडात आणले. किरण ब्लास गुत्तीयारीस (वय ४७, रा. ४०२, चेतना अपार्टमेंट, ईस्ट स्ट्रीट, कॅम्प) असे त्या महिलेचे नाव आहे. तिच्याविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पासपोर्ट अ‍ॅक्ट १९६७ कलम १२ (ब) अन्वये तिच्याविरुद्ध गुन्हा 
नोंदविण्यात आला आहे. सायंकाळी तिला अटक करण्यात आली.
पुण्यामध्ये परतल्यानंतर किरणने खडकी पोलीस ठाण्यात पासपोर्ट हरविल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर गॅझेटमध्ये जाहिरात प्रसिध्द करून नावात बदल करून घेतला. पिंपरी येथील पत्ता दाखवून बदललेल्या नावावर नवीन पासपोर्टसाठी अर्ज केला. पासपोर्टकरिता पोलिस व्हेरिफिकेशन चालू असताना तिच्या नावात व पत्त्यामध्ये बदल झाल्याने तिच्यावरील गुन्हेच रेकॉर्डवर दिसू शकले नाहीत. त्यामुळे अगदी सहजपणे तिला नवीन नावाने पासपोर्ट मिळला.
किरणचे कुटुंबिय मुळचे पुण्याचे. तिचे वडील व्यवसायाच्या निमित्ताने १९७० साली स्पेनमध्ये स्थायिक झाले. त्यानंतर किरणने स्पेनमधील एका बँकेच्या संचालकाशी लग्न केले. डिसेंबर २००९ मध्ये ती स्पेनला गेली असताना एका आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तिला अटक झाल्यानंतर तेथील न्यायालयाने तिचा पासपोर्ट जप्त केला होता. त्यावेळी
तिच्या २४ वर्षीय मुलीच्या पासपोर्टवरून ती भारतात पळून आली आहे.कारवाई पूर्ण होताच इंटरपोल घेणार ताब्यात
स्पेनमधून पलायन केल्यानंतर तिच्याविरूद्ध इंटरपोलने रेडकॉर्नर नोटीस जारी केली होती. एफआरओकडून तपास सुरू झाल्यानंतर ती वॉन्टेड असल्याचे निष्पन्न झाले. इंटरपोलच्या अधिकाऱ्यांना तातडीने याची माहिती कळविण्यात आली आहे.

Web Title: The women who fled India are finally arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.