गोव्यात महिलांची तस्करी

By Admin | Updated: June 11, 2015 01:18 IST2015-06-11T01:18:06+5:302015-06-11T01:18:06+5:30

देशातील १८ राज्यांतून तसेच विदेशांतूनही गोव्यात महिलांची शरीरविक्रय व्यवसायासाठी तस्करी झाल्याचे पोलीस कारवायांतील नोंदीतून स्पष्ट झाले

Women smuggled in Goa | गोव्यात महिलांची तस्करी

गोव्यात महिलांची तस्करी

पणजी : देशातील १८ राज्यांतून तसेच विदेशांतूनही गोव्यात महिलांची शरीरविक्रय व्यवसायासाठी तस्करी झाल्याचे पोलीस कारवायांतील नोंदीतून स्पष्ट झाले. त्यामुळे गोवा मानवी तस्करीची बाजारपेठ म्हणून कुप्रसिद्ध झाल्याचे दिसत आहे.
पणजी पोलीस मुख्यालयातील कार्यक्रमात ‘अर्ज’ या स्वयंसेवी संस्थेचे प्रकल्प अधिकारी अरुण पांड्ये यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की गोव्याची ओळख मानवी तस्करीची बाजारपेठ म्हणून होऊ पाहात आहे. ही चिंतेची गोष्ट आहे.
ईशान्य-दक्षिण भारतातील १८ राज्ये व मुंबईतील मुलींना गोव्यात शरीरविक्रीसाठी आणले जाते. नेपाळ व इतर देशांतील युवतींचीही येथे तस्करी केली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Women smuggled in Goa