महिला विक्रीकर निरीक्षक लाच घेताना जाळ्यात
By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:16+5:302015-02-13T23:11:16+5:30
पुणे : व्यवसाय बंद केल्यानंतर विक्रीकराच्या परताव्याचा धनादेश देण्यासाठी १ हजार रुपयांची लाच घेताना महिला विक्रीकर निरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही कारवाई केली.

महिला विक्रीकर निरीक्षक लाच घेताना जाळ्यात
प णे : व्यवसाय बंद केल्यानंतर विक्रीकराच्या परताव्याचा धनादेश देण्यासाठी १ हजार रुपयांची लाच घेताना महिला विक्रीकर निरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही कारवाई केली. नयना राजन गुहागरकर (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एका व्यावसायिकाने लेखी तक्रार दिली आहे. त्यांचा मोल्डींग प्रेसचा व्यवसाय होता. हा व्यवसाय त्यांनी २०१३ मध्ये बंद केला होता. व्यवसायाची विक्रीकर नोंदणी रद्द केल्यानंतर त्यांनी विक्रीकर रिफंडसाठी अर्ज केला होता. त्याचा परतावा धनादेशाद्वारे मिळणार होता. परंतु हा धनादेश देण्यासाठी गुहागरकर यांनी १ हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुरुवारी तक्रार केली. त्यानुसार अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली येरवड्यातील विक्रीकर भवनामध्ये सापळ्याचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळी पाचच्या सुमारास गुहागरकर यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्याची माहिती उपअधीक्षक गणेश मोरे यांनी दिली.------