शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएस अधिकाऱ्यावर महिला झाली फिदा; भेटण्यासाठी सोडले घरदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 12:34 IST

 एका हँडसम पोलीस अधिकाऱ्यावर फिदा झालेल्या एका महिलेने घरदार सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  

उज्जैन - फिल्मस्टार, क्रिकेटपटू यांच्यावरील प्रेमापोटी त्यांना भेटण्यासाठी तरुण तरुणींनी घर सोडल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले, वाचले असेल. पण  एका हँडसम पोलीस अधिकाऱ्यावर फिदा झालेल्या एका महिलेने घरदार सोडून त्याला भेटण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये धाव घेतल्याचा धक्कादायक प्रकार  समोर आला आहे.  पंजाबमधील होशियारपूर येथील 27 वर्षीय महिला उज्जैन येथे कर्तव्यावर असलेले आयपीएस अधिकारी सचिन अतुलकर यांच्या प्रेमात पडली. त्यांना भेटण्यासाठी या महिलेने पंजाबहून थेट मध्य प्रदेश गाठले. अतुलकर यांना भेटण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिचे समुपदेशन करून तिला परत घरी पाठवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहे. महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी रेखा वर्मा यांनी सांगितले की, "ही महिला एसपी सचिन अतुलकर यांना भेटण्याचा प्रयत्न करत होती. तसेच ती त्यांच्या कार्यक्रमांमध्येही पोहोचली होती.  या महिलेच्या पालकांना आम्ही बोलावून घेतले आहे. मात्र ती त्यांच्यासोबत जाण्यास तयार नाही." आपण रस्ता चुकून उज्जैनला आल्याचा दावा या महिलेने केला आहे. मात्र एसपी सचिन अतुलकर यांना भेटण्याच्या हट्टावर ती अडून बसली आहे. सोशल मीडियावर अतुलकर यांची छायाचित्रे पाहिल्यानंतर मी त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर भाळले, असे तिने सांगितले. दरम्यान, या महिलेचे आई-वडील उज्जैन येथे पोहोचले असून, ते तिची समजूत घालत आहेत.  या प्रकाराबाबत सचिन अतुलकर म्हणाले की, कार्यालयीन वेळेत मी कुणालाही भेटण्यास तयार आहे. मात्र व्यक्तिगत प्रकरणामध्ये मी इच्चेविरुद्ध कुणाला भेटणार नाही. मी सागर जिल्ह्यात एसपी असताना एका सात वर्षांच्या मुलाने स्वाक्षरीसाठी मला भेटण्याचा हट्ट केला होता, अगदी खाणे पिणे सोडण्याची धमकी दिली होती. त्याच्या आईवडिलांनी मला यासंदर्भात सांगितल्यावर मी त्या मुलाला भेटलो होते.  

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिसWomenमहिला