शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! मास्क न लावल्याने केली कारवाई पण 35 गावांचा वीजपुरवठा झाला ठप्प​, जाणून घ्या नेमकं झालं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 09:03 IST

Power Cut Of 35 Villages : मास्क न लावल्याने कारवाई करणं तब्बल 35 गावांना महागात पडलं आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. तर अनेक ठिकाणी मास्क न लावल्यास दंड आकारण्यात येत आहे. मास्क न लावल्याने कारवाई करणं तब्बल 35 गावांना महागात पडलं आहे. कारण यामुळे 35 गावांचा वीजपुरवठा झाला ठप्प​ झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या जिल्हा बदायूं जिल्ह्यातील कुंवरगावमध्ये ही घटना घडली आहे. 

एका महिला पोलीस अधिकाऱ्याने तपासणीदरम्यान मास्क न घातल्याबद्दल वीज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्याला दंड ठोठावला. मात्र कर्मचाऱ्याने वाद घातल्याने निरीक्षकाने त्याच्या कानशिलात लगावली आणि नंतर पोलिस ठाण्यात नेलं. यामुळे वीज वितरण विभागाचे कर्मचारी संतप्त झाले आणि वीज विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसले. तसेच या कर्मचाऱ्यांनी निषेध म्हणून तब्बल 35 गावांचा वीजपुरवठा बंद केला. 

"महिला अधिकाऱ्याने मोबाईल हिसकावून घेतला आणि कानशिलात लगावली"

सुनील कुमार असं वीज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. सुनील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटदुखीचं औषध घेण्यासाठी निघालो होतो आणि त्याचवेळी चौकाजवळ तपासणी सुरू होती. कुंवरगाव पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या पोलीस अधिकारी शर्मिला शर्मा यांनी थांबवलं. मास्क न घातल्याने दंड बजावला. वीज कर्मचारी असल्याने वीज अभियंत्यांशी बोलण्यासाठी मोबाईल बाहेर काढला असता महिला अधिकाऱ्याने मोबाईल हिसकावून घेतला आणि कानशिलात लगावली असा आरोप सुनील कुमार यांनी केला आहे.

"सुनील कुमार यांना सोडण्यास नकार दिल्याने वीज विभागाचे कर्मचारी आक्रमक"

सुनील यांनी आपल्याला मारहाण करत पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आणि कोठडीत बंद केल्याचं देखील म्हटलं आहे. घटनेची माहिती मिळताच वीज विभागाचे कर्मचारी सुनील कुमार यांना सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले. मात्र पोलिसांनी सुनील कुमार यांना सोडण्यास नकार दिल्याने वीज विभागाचे कर्मचारी आक्रमक झाले. त्यांनी पोलीस ठाण्यात आंदोलन करण्यास सुरवात केली. तसेच वीज उपकेंद्रात धरणं आंदोलन सुरू केलं. यानंतर कर्मचार्‍यांनी शहरासह अनेक गावांचा वीजपुरवठाही बंद केला. सीओ सिटी घटनास्थळी पोहोचले आणि कर्मचार्‍यांना कारवाईचे आश्वासन देऊन वीजपुरवठा सुरू केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशelectricityवीजPoliceपोलिस