शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' महिला पोलिसाने अभिनेत्री नयनतारा असल्याचे भासवून गँगस्टरला केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 17:08 IST

एका चणाक्ष महिला पोलीस अधिका-याने दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री नयनताराच्या फोटोचा वापर करुन एका गँगस्टरला सापळयात अडकवले.

ठळक मुद्देचोरलेल्या फोन्सचे कॉल डिटेल्स तपासल्यानंतर हसनैन अजूनही तो फोन वापरत असल्याचे लक्षात आले.एक सौदर्यवती तरुणी असल्याचे भासवून मधुबाला देवी यांनी हसनैनशी संपर्क साधण्यास सुरुवात केली.

पाटणा - बिहारमध्ये एका चणाक्ष महिला पोलीस अधिका-याने दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री नयनताराच्या फोटोचा वापर करुन एका गँगस्टरला सापळयात अडकवले. या प्रकरणी दरभंगा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी मोहम्मद हसनैन या गँगस्टरने भारतीय जनता पार्टीचे नेते संजय कुमार महंतो यांचा महागडा मोबाईल फोन चोरी केला. महंतो यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुबाला देवी यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला. 

चोरलेल्या फोन्सचे कॉल डिटेल्स तपासल्यानंतर हसनैन अजूनही तो फोन वापरत असल्याचे लक्षात आले. अनेकवेळा पोलिसांनी हसनैनला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो पोलिसांच्या तावडीतून निसटायचा. त्यानंतर मधुबाला देवी यांनी हसनैनला पकडण्यासाठीची  रणनिती बदलली. एक सौदर्यवती तरुणी असल्याचे भासवून मधुबाला देवी यांनी हसनैनशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. 

आपण प्रेम मिळवण्यासाठी किती आतुर आहोत ते दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मधुबाला देवी त्याला नियमितपणे फोन करायच्या. सुरुवातीला हसनैन त्यांना फारसा प्रतिसाद देत नव्हता. पण नंतर एक फोटो पाहून हसनैन अगदी सहजगत्या त्यांच्या जाळयात फसला. हसनैनने एकदिवस मधुबाला देवींना त्यांचा फोटो पाठवायला सांगितला. त्यावेळी मधुबाला देवी यांनी त्यांच्या मोबाईल फोनवर प्रोफाईल फोटो म्हणून दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री नयनताराचा फोटो लावला. 

हसनैनने जेव्हा मोबाईल फोनमधला प्रोफाईलवरचा फोटो पाहिला तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. तो दरभंगा येथे एका ठिकाणी भेटण्यास तयार झाला. जेव्हा हसनैन ठरलेल्या ठिकाणी पोहोचला तेव्हा साध्या वेषातील पोलिसांनी त्याला पकडले असे मधुबाला देवी यांनी सांगितले. मोहम्मद हसनैनने त्याचा गुन्हा कबूल केला. आपण दुस-या एका गुन्हेगाराकडून साडेचार हजार रुपयांना हा मोबाईल विकत घेतल्याचे त्याने सांगितले. आता त्या दुस-या आरोपीचा शोध सुरु आहे. मधुबाला देवी यांनी जी हुशारी दाखवली त्याबद्दल बिहार पोलिसांनी त्यांना बक्षिस जाहीर केले आहे.