महिला खासदाराच्या कुुटुंबावर लैंगिक शोषणाचा आरोप
By Admin | Updated: August 10, 2016 17:02 IST2016-08-10T13:47:31+5:302016-08-10T17:02:55+5:30
वादग्रस्त नेत्या शशिकला पुष्पा यांच्या कुटुंबा विरोधात टुटीकॉरइन पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

महिला खासदाराच्या कुुटुंबावर लैंगिक शोषणाचा आरोप
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. १० - घरकाम करणा-या मुलींचा छळ केल्या प्रकरणी वादग्रस्त नेत्या शशिकला पुष्पा यांच्या कुटुंबा विरोधात तुतीकोरीन पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. खासदार शशिकला पुष्पा यांची अलीकडेच अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी करण्यात आली. विमानतळावर द्रमुक नेत्याच्या कानाखाली लगावणे त्यानतंर संसेदत भाषण करताना रडू कोसळल्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या.
आणखी वाचा
शशिकला यांचे पती आणि मुलगा प्रदीप राजा यांचे नाव तक्रारीत आहे. शिशकला यांचा नवरा आणि मुलाने केलेला अटकपूर्व जामिन अर्ज मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. शशिकला यांच्याकडे घरकाम करणा-या दोन बहिणींनी आपला मानसिक आणि शारीरीक छळ केल्याचा एफआयआर दाखल केला.
शिशकला यांचे पती आणि मुलाने आमचे लैंगिक शोषण केला असा आरोपही त्यांनी केला आहे. घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा शशिकला यांनी आपल्याला मारहाण केली असा आरोप एका बहिणीने केला आहे.